प्राणहिता वन प्रकल्प विभागात गोंधळ — साग लाकूड तस्करी प्रकरणी एफडीसीएम कर्मचारी चौकशीत
सिरोंचा वनविभागातील चितलपल्ली वनोपज तपासणी नाक्यावर 30.09.2025 रोजी रात्री उघडकीस आलेल्या साग लाकूड तस्करी प्रकरणाने वनविभाग आणि वनविकास महामंडळ (एफडीसीएम)मध्ये खळबळ उडवली आहे. या घटनेवरून वनगुन्हा क्र. 09/2025 दिनांक 01.10.2025 असा गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौकशीदरम्यान अटक आरोपी संदीप दामोधर मडावी (रा. कन्हाळगाव, जि. चंद्रपूर) याने एफडीसीएममधील चार वनरक्षक आणि काही रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीकडून घेतलेल्या कबुलीजबाबावरून जितेंद्र धर्मराव मडावी, प्रमोद पेंदाम, संदीप जाधव आणि जिवनदास गव्हारे हे चार वनरक्षक तसेच संतोष कुमरे, किशोर पेंदोर, पुरव मडावी आणि ब्रम्हा तांडिया हे रोजंदारी मजूर या अवैध साग लाकूड वाहतुकीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-----------
वाचावे : वनहक्क दावा प्रलंबित असताना अतिक्रमण निष्कासित करणे बेकायदेशीर आहे - उच्च न्यायालय आदेश
-----------
घटनेच्या रात्री चितलपल्ली नाक्यावर तपासणी करत असताना अज्ञात वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहनचालकाने वाहनासह पळण्याचा प्रयत्न केला मात्र वनमजुरांनी पाठलाग करून त्याला पकडले. तपासणीदरम्यान वाहनात लोखंडी कप्प्यात लपवलेले साग लाकडाचे पाच नग लठ्ठे (किंमत ₹51,325) आढळले. वाहन क्रमांक MH-34/AB-5484 आणि दुचाकी क्रमांक MH-33/X-9726 तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण मालाची किंमत ₹6,03,825 इतकी आहे. चौकशीदरम्यान आरोपीने आसरअली येथील फर्निचर मार्ट मालक रवी कासोजी, महादेवपूर येथील ठेकेदार सुधाकर चिरलावंचा, तसेच बबलू आणि सुधाकर मंचार्ला यांना अनेकदा साग माल विक्री केल्याचे सांगितले आहे.
-----------
वाचावे : अटक आरोपीला 24 तासात कोर्टात हजर केले नाही तर अटक बेकायदेशीर होते
-----------
या घटनेनंतर एफडीसीएम आलापल्ली येथील विभागीय व्यवस्थापकांनी वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांना 01.10.2025 पासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर एफडीसीएम कर्मचारी वर्तणूक, शिस्त व अपील नियमांनुसार शिस्तभंगाची कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक व्यवस्थापक एस. व्ही. भोवते यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी 06.10.2025 पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत जितेंद्र मडावी यांचे मुख्यालय अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयात राहणार असून त्यांना नियमांनुसार निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
----------
वाचावे : वनरक्षक यांच्या आंतरवृत्तीय बदली बाबत सूचना 2025
--------
या प्रकरणामुळे प्राणहिता वन प्रकल्प विभाग आणि सिरोंचा वनपरिक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विभागातीलच काही कर्मचाऱ्यांचा अवैध साग लाकूड तस्करीत सहभाग असल्याची शक्यता समोर येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी जलद गतीने सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील चौकशी अहवाल निर्णायक ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
🌳 FAQ – सिरोंचा वनगुन्हा क्र. 09/2025 : साग लाकूड तस्करी प्रकरण
1️⃣ प्रश्न : सिरोंचा वनगुन्हा क्र. 09/2025 प्रकरणात नेमके काय घडले?
👉 30.09.2025 रोजी रात्री चितलपल्ली वनोपज तपासणी नाक्यावर अवैध साग लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. वाहनात लोखंडी कप्प्यात लपवलेले साग लाकडाचे 5 नग लठ्ठे आढळले. त्यानंतर वनगुन्हा क्र. 09/2025 दिनांक 01.10.2025 असा गुन्हा नोंदविण्यात आला.
---
2️⃣ प्रश्न : या गुन्ह्यात कोणकोण सहभागी असल्याचा संशय आहे?
👉 अटक आरोपी संदीप दामोधर मडावीच्या कबुलीजबाबावरून एफडीसीएमचे चार वनरक्षक — जितेंद्र मडावी, प्रमोद पेंदाम, संदीप जाधव आणि जिवनदास गव्हारे — तसेच चार रोजंदारी मजूर — संतोष कुमरे, किशोर पेंदोर, पुरव मडावी आणि ब्रम्हा तांडिया — यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
---
3️⃣ प्रश्न : या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे?
👉 एफडीसीएम आलापल्ली येथील विभागीय व्यवस्थापकांनी वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांना 01.10.2025 पासून निलंबित केले आहे. तसेच सहाय्यक व्यवस्थापक एस. व्ही. भोवते यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
---
4️⃣ प्रश्न : किती माल आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला?
👉 ट्रॅक्टर (MH-34/AB-5484), दुचाकी (MH-33/X-9726) आणि साग लाकडाचे 5 नग लठ्ठे जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत ₹6,03,825 इतकी आहे.
---
5️⃣ प्रश्न : अवैध साग लाकूड कोणाला विकण्यात आले होते?
👉 आरोपीने कबूल केल्याप्रमाणे आसरअली येथील फर्निचर मार्ट मालक रवी कासोजी, महादेवपूर येथील ठेकेदार सुधाकर चिरलावंचा, तसेच बबलू आणि सुधाकर मंचार्ला यांना साग माल विक्री करण्यात आला होता.
---
6️⃣ प्रश्न : पुढील चौकशी कोण करत आहे आणि अहवाल कधी अपेक्षित आहे?
👉 सहाय्यक व्यवस्थापक एस. व्ही. भोवते यांना प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना 06.10.2025 पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---
7️⃣ प्रश्न : या प्रकरणामुळे कोणत्या विभागात खळबळ उडाली आहे?
👉 प्राणहिता वन प्रकल्प विभाग आणि सिरोंचा वनपरिक्षेत्र या दोन्ही ठिकाणी या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी तपासावर लक्ष ठेवून आहेत.
---
8️⃣ प्रश्न : या बातमीशी संबंधित कीवर्ड कोणते आहेत?
👉 Sironcha Van Gunha 09/2025, FDCM forest guards suspended, Sag wood smuggling Maharashtra, Pranhita Forest Project, illegal teak wood transport case,
वनगुन्हा सिरोंचा 2025, एफडीसीएम निलंबन आदेश.
0 Comments