वनरक्षक संवर्गातील कर्मचा-यांच्या आंतरवृत्तीय बदलीबाबत. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) नागपूर यांचे पत्र दिनांक 29.07.2025
संदर्भ:शासन, महसूल व वनविभाग निर्णय क्र. एफएसटी-०३/१५/प्र.क्र.१५६ /फ-४, दिनांक 06.08.2015
वनविभागात वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया ही वनवृत्त स्तरावरील प्रादेशिक निवड समितीमार्फत करण्यात येते. वनरक्षक पदाचे दिनांक ३०/६/२०११ चे सेवाप्रवेश नियमातील नियम १३ मध्ये वनरक्षक पदावर नियुक्त व्यक्ती ही वनवृत्त स्तरावर बदलीस पात्र राहील, अशी तरतूद आहे. वनरक्षक पदाची जेष्ठता यादी सुध्दा वनवृत्त स्तरावर ठेवण्यात येत असून सर्व ११ वनवृत्तांच्या वनरक्षक पदाच्या जेष्ठता याद्या स्वतंत्र आहेत.
२. वनरक्षकांच्या त्यांच्या विनंतीवरुन एका वनवृत्तातून दुस-या वनवृत्तात बदली करताना ज्या वनवृत्तात बदली करण्यात आली त्या वनवृत्तात शुन्य जेष्ठतेवर ठेवण्यात येते. म्हणजेच ज्या दिनांकास तो वनरक्षक आंतरवृत्तीय बदलीनंतर रुजू होईल त्या दिनांकापासून त्याची जेष्ठता धरण्याचे प्रचलित धोरण आहे. याबाबत स्पष्ट तरतूद संदर्भिय शासन निर्णयात करण्यात आली आहे.
३. तथापी असे निदर्शनास आले आहे की, आंतरवृत्तीय बदली झाल्यानंतर अनेक वनरक्षक त्यांचे प्रथम नियुक्तीचे दिनांकापासून जेष्ठता मिळणेबाबत विनंती करत आहे. त्याचप्रमाणे याबाबत न्यायालयीन प्रकरणे सुध्दा दाखल करण्यात येत आहे. काही प्रकरणात न्यायालयाने अर्जदारांचे बाजूने निर्णय दिल्याचेही दिसून येते. न्यायालयाचे आदेशाविरुध्द अपील /पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.
४. या प्रकरणी शासनाचे प्रचलित धोरण व न्यायालयाचे निर्देश विचारात घेता याद्वारे असे निर्देश देण्यात येत आहेत की, आंतरवृत्तीय बदली झाल्यानंतर ज्या वनरक्षकांनी त्यांचे प्रथम नियुक्तीचे दिनांकापासून जेष्ठता मिळणेबाबत न्यायालयीन प्रकरणे दाखल केले आहे व त्यांचे बाजूने निर्णय झाला आहे, अशा प्रकरणी न्यायालयाचे आदेशानुसार त्यांना प्रथम नियुक्तीचे दिनांकापासून जेष्ठता द्याव्याची असल्यास, अशा वनरक्षकांचे नाव त्यांचे आंतरवृत्तीय बदलीपूर्वी ज्या वनवृत्ताचे जेष्ठता यादीत होते (उदा. अ वनवृत्त) त्या वनवृत्तात पुन्हा रुजू होणेकरीता त्यांना कार्यरत वनवृत्तातून (उदा. ब वनवृत्त) कार्यमुक्त करावे. तसेच पूर्वीच्या वनवृत्ताने (अ वनवृत्त) त्यास रुजू करुन घेऊन पदस्थापना द्यावी. त्यानंतर प्रथम नियुक्ती झालेल्या वनरक्षकाचे नाव पूर्वीच्या वनवृत्ताने (अ वनवृत्त) वनरक्षकाचे जेष्ठता यादीत प्रथम नियुक्तीचे जेष्ठतेचे दिनांकानुसार समाविष्ट करावे. यानंतर सदर वनरक्षकाचे नाव सद्या कार्यरत असलेल्या वनवृत्तातील (ब वनवृत्त) वनरक्षकाचे जेष्ठता यादीतून कमी करावे.
५. वरीलप्रमाणे कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावो.
----------------------------------------------------------------
📚 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – वनरक्षक आंतरवृत्तीय बदली आणि वरिष्ठता धोरण
---प्रश्न 1: वनरक्षक पदाची भरती कशा पद्धतीने केली जाते?
उत्तर:
वनरक्षक पदाची भरती वनवृत्त स्तरावरील प्रादेशिक निवड समितीमार्फत केली जाते. प्रत्येक वनवृत्तासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया आणि वरिष्ठता यादी ठेवली जाते.
---
प्रश्न 2: वनरक्षक पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बदलीस पात्रता असते का?
उत्तर:
होय. वनरक्षक पदाचे सेवा प्रवेश नियम (दिनांक 30.06.2011) यांच्या नियम 13 नुसार, वनवृत्त स्तरावर बदलीस पात्रता आहे.
---
प्रश्न 3: आंतरवृत्तीय बदली झाल्यावर वरिष्ठतेचा दर्जा कसा दिला जातो?
उत्तर:
जेव्हा एखादा वनरक्षक एका वनवृत्तातून दुसऱ्या वनवृत्तात बदली होतो, तेव्हा त्याला त्या नवीन वनवृत्तात शून्य वरिष्ठतेपासून गृहित धरले जाते. म्हणजेच, त्याची वरिष्ठता त्या रुजू होण्याच्या तारखेपासून मोजली जाते.
---
प्रश्न 4: काही वनरक्षक प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून वरिष्ठता मागतात, त्यावर काय निर्णय आहे?
उत्तर:
अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना न्यायालयाने प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून वरिष्ठता देण्याचे आदेश दिले आहेत, त्यांना ती वरिष्ठता पूर्ववत वनवृत्तात देण्यात येणार आहे.
---
प्रश्न 5: अशा न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी कशी केली जाते?
उत्तर:
1. संबंधित वनरक्षकास सध्याच्या वनवृत्तातून (उदा. ब वनवृत्त) कार्यमुक्त केले जाते.
2. पूर्वीच्या वनवृत्तात (उदा. अ वनवृत्त) पुन्हा रुजू करून घेतले जाते.3. त्याचे नाव पूर्वीच्या वरिष्ठता यादीत प्रथम नियुक्तीच्या दिनांकानुसार समाविष्ट केले जाते.
4. त्याचे नाव सध्याच्या वनवृत्तातील वरिष्ठता यादीतून कमी केले जाते.
---
प्रश्न 6: संबंधित कार्यवाहीचा अहवाल कुठे सादर करायचा असतो?
उत्तर:
संपूर्ण कार्यवाही पूर्ण केल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयास अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
---------------- ------------------------- -------------
0 Comments