चितळ शिकार प्रकरणातील वृत्त खोटे – FDCM कडून अधिकृत खंडन
Friday, July 11, 2025
चितळ शिकार प्रकरणातील वृत्त खोटे – FDCM कडून अधिकृत खंडन
दिनांक ९ जुलै २०२५ रोजी आलापल्ली येथे घडलेल्या चितळ शिकार प्रकरणासंदर्भात दिनांक ११ जुलै २०२५ रोजी लोकमत न्युज नेटवर्क, गडचिरोली (मराठी व इंग्रजी) द्वारे प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तामध्ये "वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याला शिजवलेल्या मांसासह ताब्यात घेण्यात आले" तसेच "two employees of FDCM were allegedly found cooking deer meat" अशा प्रकारच्या मथळ्याखाली बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. सदर वृत्ताचे वनविकास महामंडळ (FDCM) कडून अधिकृतरित्या खंडन करण्यात आले असून, ही बातमी आधारहीन, चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे विभागीय व्यवस्थापक सी.एल. राजपूत, प्राणहिता वन प्रकल्प विभाग, आलापल्ली यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, सदर शिकार प्रकरणामध्ये महामंडळाच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याची चौकशी किंवा अटक झालेली नसून, वृत्तपत्रांनी कोणतीही पूर्वतपासणी न करता ही चुकीची बातमी प्रकाशित केली आहे. या चुकीच्या बातम्यांमुळे महामंडळाची प्रतिमा समाजात व क्षेत्रात मलीन होत आहे. त्यांनी हेही नमूद केले की, भविष्यात अशा संवेदनशील प्रकरणांवर वृत्त प्रसिद्ध करताना, योग्य खात्री करूनच बातमी देणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे.
FDCM कडून चितळ शिकार प्रकरणावर अधिकृत खंडन | गडचिरोली बातमी 2. चितळ शिकार प्रकरणातील आरोप निराधार – FDCM चे खंडन 3. FDCM कर्मचाऱ्यांचा शिकार प्रकरणाशी संबंध नाही – अधिकृत स्पष्टीकरण 4. चितळ शिकार: FDCM च्या प्रतिमेला हानी करणारी चुकीची बातमी फेटाळली 5. गडचिरोली: चितळ शिकार प्रकरणावरून FDCM चा स्पष्ट भूमिका निवेदन 6. FDCM News Refutation on Alleged Involvement in Deer Poaching | July 2025
0 Comments