MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३.

 महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३.

 क्रमांक डब्ल्यूएलपी ०२.२३/प्र.क्र.५२ (भाग-२)/फ-१. महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३ (२०२३ चा महा. ३७) याच्या कलम ८ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, पुढील नियम करीत आहे:-

१. संक्षिप्त नाव. या नियमांस, महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३, असे म्हणावे,

२. व्याख्या. (१) या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर, -

(क) “अधिनियम" याचा अर्थ, महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३ (२०२३ चा महा. ३७), असा आहे;

(ख) "कुटुंब" याचा अर्थ, बळी पडलेल्या व्यक्तीची पत्नी, पती, मुले, आई किंवा वडील, असा आहे;

(ग) “नमुना" याचा अर्थ, या नियमांस जोडलेला नमुना, असा आहे.

(२) या नियमात वापरलेले, परंतु व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, या अधिनियमान्वये अनुक्रमे जो अर्थ नेमून दिलेला आहे तोच अर्थ असेल

३. इतर प्रकारच्या इजा किंवा नुकसान. अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (२) मध्ये तरतूद केलेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या इर्जाच्या किंवा नुकसानीच्या प्रकारांशिवाय, राज्य शासन, उक्त अधिनियमान्वये, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवाला झालेल्या किरकोळ इजांसाठी देखील नुकसानभरपाई प्रदान करील.

४. मंजुरी देणारा प्राधिकारी. ज्या क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली आहे त्या क्षेत्रावर अधिकारिता असणारा सहायक वनसंरक्षक हा, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी मंजुरी देणारा प्राधिकारी असेल.
५. मानवी जीवितहानी व मानवास इजा झाल्यास, नुकसानभरपाई प्रदान करण्याची कार्यपद्धती :-

( १) मानवी जीवितहानी झाल्यास, -

(क) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी जीवितहानी झाल्याबद्दलची सूचना, कोणत्याही व्यक्तीद्वारे, तात्काळ जवळच्या वनरक्षकाला लेखी स्वरूपात देण्यात येईल. अशी सूचना मिळाल्यानंतर, वनरक्षक, अशी घटना घडली आहे किंवा कसे याची खात्री करील आणि घटनेची माहिती गोळा करील आणि वस्तुस्थिती संबंधित वनपालास आणि वनक्षेत्रपालास तात्काळ कळवील.

(ख) अशा प्रकरणी, अधिनियमान्वये प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईसाठी, मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांद्वारे, अशा घटनेपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत, संबंधित वन क्षेत्रपालाकडे नमुना एकमध्ये अर्ज करण्यात येईल,

(ग) वनक्षेत्रपाल, खंड (ख) खालील असा अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देईल आणि असा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक ती चौकशी करील, वनक्षेत्रपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील,

(घ) अशा प्रकरणी, वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे शवविच्छेदन करण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदनानंतर, शवविच्छेदन अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवतील.

(२) मानवास कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास, मोठी किंवा किरकोळ इजा झाल्यास, -

(क) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवाला कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास, मोठी किंवा किरकोळ इजा झाल्यास, अधिनियमान्वये प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईसाठी, जखमी व्यक्तीद्वारे स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, अशा घटनेपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत, ज्या क्षेत्रात असा हल्ला झाला आहे त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या वनक्षेत्रपालकडे, नमुना एकमध्ये अर्ज करण्यात येईल. अर्जदार, अशा अर्जासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केलेल्या बळी पडलेल्या व्यक्तीच्या तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील सादर करील.

(ख) वनक्षेत्रपाल, खंड (क) खालील अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि असा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक चौकशी करण्यासाठी वनपालास निदेश देईल, वनपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील, वनपाल, त्याचा अहवाल पंचनाम्यासह वनक्षेत्रपालास सादर करील.

(३) वनक्षेत्रपाल, वनपालाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्याच्या विशिष्ट शिफारशीसह अर्ज, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेल्या अर्ज प्राप्त झाल्यापासून वीस दिवसांच्या आत, सहायक वनसंरक्षकाकडे पाठवील.

(४) जर संबंधित व्यक्ती, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) याच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखालील केलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करीत असताना, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली असेल तर, जखमी झालेली किंवा मृत व्यक्ती, कोणत्याही नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.

६. मानवी जीवितहानी झाल्यास नुकसानभरपाईचे प्रदान करणे. -

(१) मृत व्यक्ती प्रौढ असल्यास, नुकसानभरपाईची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :-

(क) जर मृत व्यक्तीची पत्नी / पती जिवंत असेल तर, पत्नी/ पती व मुले यांना समान हिस्सा देण्यात येईल;
ख) जर पत्नी/ पती जिवंत नसेल तर,-

(एक) जर सर्व मुले सज्ञान, असतील तर, मागे हयात असलेल्या सर्व मुलांमध्ये, नुकसानभरपाईचे समसमान विभाजन करण्यात येईल

(दोन) जर मूल अज्ञान असेल तर, नुकसानभरपाईच्या रकमेतील त्याचा हिस्सा, असे अज्ञान मूल व संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्या संयुक्त नावाने उघडलेल्या खात्यात जमा करण्यात येईल. जमा केलेली अशी नुकसानभरपाईची रक्कम, अशा अज्ञान मुलाचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याला प्रदान करण्यात येईल.

 (ग) जर मृत व्यक्तीची पत्नी/ पती आणि मुले जिवंत नसतील तर, नुकसानभरपाईची रक्कम, मृत व्यक्तीच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात येईल.

(२) मृत व्यक्ती अज्ञान असल्यास, नुकसानभरपाईची रक्कम, पुढीलप्रमाणे असेल:-

(क) नुकसानभरपाईची रक्कम, मृत व्यक्तीच्या आई वडिलांना प्रदान करण्यात येईल;

(ख) जर आई-वडील जिवंत नसतील तर, मृत व्यक्तीच्या भावंडांना समान रक्कम देण्यात येईल, जर भावंडे अल्पवयीन असतील तर, पोट-नियम (१) च्या खंड (ख) च्या उप-खंड (२) च्या तरतुदी, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.

(३) जर मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांच्या बाबतीत, कोणताही वाद उद्भवला तर, उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच केवळ नुकसानभरपाईची रक्कम प्रदान करण्यात येईल.

(४) नुकसानभरपाईची चाळीस टक्के रक्कम, मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने, ती ज्या व्यक्तीला मंजूर केलेली आहे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात येईल आणि नुकसानभरपाईची साठ टक्के रक्कम, अशा व्यक्तीच्या मासिक व्याज मिळणाऱ्या मुदत ठेव खात्यात दहा वर्षांसाठी जमा करण्यात येईल, दहा वर्षांनंतर, मुदत ठेवीची मुदत समाप्त झाल्यावर, अशा खात्यातील रक्कम त्या व्यक्तीला प्रदान करण्यात येईल,

(५) बळी पडलेल्या कुटुंबातील सदस्याचा गंभीर आजार, शैक्षणिक प्रयोजन व विवाह यासाठी, मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने, मुदत ठेवीतील रक्कम, काढता येऊ शकेल.

७. पशु जीवांची हानी किंवा पशुंना इजा पोहचल्यास, नुकसानभरपाई प्रदान करण्याची कार्यपध्दती.-

(१) पशु जीवांची हानी झाल्यास किंवा पशुंना इजा पोहचल्यास, पशुंचा मालक, नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, अट्ठेचाळीस तासांच्या आत, नमुना दोनमध्ये अर्ज करील.
(२) पहुंचा मालक, तो किंवा कोणतीही व्यक्ती, वनपालाकडून निरीक्षण करण्यात येईपर्यंत, अशा पशुचे शव घटनास्थळावरून हलविले जाणार नाही याची काळजी घेईल, अन्यथा, तो नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.
(३) वनक्षेत्रपाल, खंड (क) खालील अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक ती चौकशी करण्यासाठी संबंधित वनपालास निदेश देईल, वनपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील.
(४) वनपाल मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या पशुची, शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून
घेईल, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या पशुची तपासणी केल्यानंतर, पशुचा मृत्यू किंवा इजा, वन्य प्राण्यामुळे झाली आहे किंवा नाही याची विशिष्ट निरीक्षणे नोंदविल्यावर, वनपालाला वैद्यकीय प्रमाणपत्र देईल, वनपाल, पंचनाम्यासह त्याचा अहवाल आणि असे वैद्यकीय प्रमाणपत्र वनक्षेत्रपालास सादर करील.
(५) वनक्षेत्रपाल, वनपालाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पशुच्या बाजार मूल्याचे मूल्यानिर्धारण करील. वनक्षेत्रपाल, असा अर्ज व त्याच्या विशिष्ट शिफारशींसह आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला अर्ज प्राप्त झाल्यापासून वीस दिवसांच्या आत, सहायक वनसंरक्षकास पाठवावीत.
(६) जेथे पशुंना प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे अशा राष्ट्रीय उद्यानाच्या किंवा अभयारण्याच्या कोणत्याही क्षेत्रात अशा पशुने प्रवेश केला असेल आणि अशा क्षेत्रातील वन्य प्राण्याने पशुला ठार मारले असेल तर, अर्जदार, या अधिनियमाखालील नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.
(७) जर, कोणत्याही वन्य प्राण्याचा, घटनेच्या ठिकाणापासून दहा किलोमीटरच्या परिघात, विषबाधेमुळे सहा दिवसांच्या आत मृत्यू झाला असेल तर, अशा पशुचा मालक, या अधिनियमान्वये नुकसानभरपाई मिळण्यास पात्र असणार नाही. 

८. पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाईचे प्रदान करण्याची कार्यपध्दती.-

(१) पिकांचे किंवा फळझाडांचे नुकसान झाल्यास, मालक, या अधिनियमान्वये प्रदेव असलेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी, जेथे असा हल्ला झाला असेल त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, बहात्तर तासांच्या आत, नमुना - तीनमध्ये अर्ज करील.

(२) पिकांचे किंवा फळझाडांचे नुकसान झाल्यास, त्या क्षेत्राचा वनरक्षक, कृषी सहायक व तलाठी यांचा समावेश असलेली समिती, संयुक्तपणे शेताची पाहणी करील आणि वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यनिर्धारण करील आणि अहवाल तयार करील आणि अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, अहवाल, वनक्षेत्रपालास सादर करील.

(३) जंगली हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास, मालक, या अधिनियमान्वये प्रदेय असलेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी, जेथे असा हल्ला झाला असेल त्या क्षेत्रावर अधिकरिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, बहात्तर तासांच्या आत्त, नमुना- तीनमध्ये अर्ज करील.

(४) जंगली हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास, त्या क्षेत्राचा वनक्षेत्रपाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता च तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा समावेश असलेली समिती, नुकसानीची पाहणी करील व मूल्यनिर्धारण करील आणि अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, पंचनामा करील. अशा घटनेत, समितीकडून पंचनामा व नुकसानीचे मूल्यनिर्धारण पूर्ण होईपर्यंत, अर्जदार, कोणतीही गोष्ट हलविणार किंवा घटनास्थळाचे चित्र बदलणार नाही किंवा दुरुस्तीचे कोणतेही काम करणार नाही.

(५) वनक्षेत्रपाल, पोट-नियम (३), व यथास्थिति, पोट-नियम (४) मध्ये निर्दिष्ट केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अर्ज व अशा समितीचा अहवाल त्याच्या विशिष्ट शिफारशींसह, तात्काळ, सहायक वनसंरक्षकांकडे पाठवील.

 (६) पुढील प्रकरणी नुकसानभरपाई प्रदेय असणार नाही:-

(क) जर लागवडीखालील जमीन हो, वन जमिनीवरील नियमित न केलेले अतिक्रमण असेल तरः

(ख) जमिनीच्या मालकाने किंवा लागवडदाराने, घटनेच्या दिनांकापासून गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) किंवा वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) या खालील कोणताही अपराध केलेला असेल तर.

९. व्याज दर. 

जर नुकसानभरपाईचे प्रदान करण्यास, वनक्षेत्रपालास, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसपिक्षा अधिक विलंब झाला असेल तर, नुकसानभरपाईच्या रक्कमेसह, नुकसानभरपाईच्या रकमेवर दर साल सहा टक्के दराने व्याज प्रदेय असेल.

Post a Comment

0 Comments