MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अवैध वृक्षतोड वाहतूक प्रकरणात कारवाई कशी करावी यासंबंधी संपूर्ण कागदपत्रे


नमस्कार,  

मी, सागर वाकचौरे,  (Sagar Wakchaure)तुम्हाला एक काल्पनिक घटना आणि त्यासंबंधीची कागदपत्रं शेअर करत आहे. ( कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा ) ही घटना अवैध वृक्षतोड आणि लाकडाच्या बेकायदेशीर वाहतुकीबाबत आहे, जी मी काल्पनिक स्वरूपात दिनांक 31 मार्च 2025 रोजी नगर-शिर्डी महामार्गावर मौजे घोरपडवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे घडल्याचं गृहीत धरलं आहे. या काल्पनिक प्रकरणात वन विभागाने कारवाई करून 5.20 घनमीटर निंबाचे लाकूड आणि एक ट्रॅक्टर जप्त केलं. यात शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, मजूर आणि वन कर्मचारी यांचा सहभाग आहे, आणि याची सविस्तर कागदपत्रं मी तुम्हाला पाठवत आहे.

या काल्पनिक घटनेचा पंचनामा, शेतकरी शुभम रावसाहेब खिल्लारी, वाहन मालक अली फैज इनामदार, वाहन चालक संतोष बाबुराव पाटील, गस्ती पथकातील वन कर्मचारी (सागर वाकचौरे, राधाकिसन घोडसरे, नामदेव गावंडे, भागवत पारधी), गावचे पोलिस पाटील दत्तात्रय बापूराव पाटील यांचे जबाब, तसेच मजुरांना (रमेश विठ्ठल पवार, बाळू दत्तू शिंदे, संजय मारुती गायकवाड, दशरथ नाना खरात) आणि वाहन मालकाला तपासासाठी बोलावण्याच्या नोटिसेस ही सगळी कागदपत्रं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही कागदपत्रं पूर्णपणे काल्पनिक आहेत, पण त्यातून तुम्हाला अशा घटना जर प्रत्यक्षात घडल्या, तर त्या कशा हाताळल्या जाऊ शकतात, वन विभाग कशी कारवाई करू शकतो, आणि कोणत्या कायदेशीर बाबींचा समावेश होतो हे समजेल.

मला वाटतं, अशा स्वरूपाच्या घटना आपल्या कार्यक्षेत्रात घडत असतात किंवा घडू शकतात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो की, जर आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी अशा अवैध वृक्षतोड किंवा लाकडाच्या वाहतुकीच्या घटना घडल्या, तर या काल्पनिक कागदपत्रांचा आधार घेऊन आपण योग्य ती कारवाई करू शकतो. भारतीय वन अधिनियम, 1927 आणि महाराष्ट्र वन नियमावली यांचे कायदे खूप कडक आहेत, आणि विनापरवानगी झाडं तोडणे किंवा लाकडाची वाहतूक करणे यामुळे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. या कागदपत्रांमधून तुम्हाला पंचनामा कसा तयार करावा, जबाब कसे घ्यावेत, नोटिसा कशा जारी कराव्यात आणि कायदेशीर प्रक्रिया कशी पुढे कशी करावी या बाबत आपणास कल्पना येऊ शकते.

ही कागदपत्रं तुम्ही काळजीपूर्वक वाचावीत आणि आपल्या कार्यक्षेत्रात अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायद्याचं पालन करण्यासाठी प्रेरणा घ्यावी. पर्यावरणाचं रक्षण आणि कायदेशीर कारवाईसाठी आपण सगळे मिळून एक पाऊल पुढे टाकूया! याबाबत तुमचे काही विचार, सूचना किंवा प्रतिक्रिया असतील, तर मला नक्की कळवा. तुमच्या मतांची आणि सहभागाची वाट बघतोय!

धन्यवाद,  

सागर वाकचौरे, वनरक्षक

कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🖇️ 


सदर घटना  व पात्र काल्पनिक स्वरूपाचे आहेत 

Post a Comment

0 Comments