समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण... शासन निर्णय दिनांक 09.04.2018
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
प्रस्तावना :-
संदर्भाधीन बदली अधिनियम, २००५ नुसार शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची एका पदावरील कामकाजाचा ३ वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची बिगर अवघड बदली करण्यात येते. बदली संदर्भात नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीवर बदली प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने पदस्थापना आदेश निर्गमित करण्यात येतात. तथापि, या प्रक्रियेत संबंधित बदलीपात्र कर्मचाऱ्याची वैयक्तीक पसंती/अडचण विचारात घेतली जात नाही. परिणामी, बदलीनंतर कोणत्या ठिकाणी पदस्थापना मिळेल याबाबत बदलीचे आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित कर्मचारी पूर्णतः अनभिज्ञ राहतो. सबब, सदर प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे व या प्रक्रियेत बदलीपात्र कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेणे, या उद्देशाने नागरी सेवा मंडळाने पदस्थापने संदर्भात शिफारशी करतांना समुपदेशनाने कार्यवाही करण्याकरीता मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
0 Comments