वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करुन कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत.
Sunday, August 03, 2025
वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करुन कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत. उपवन संरक्षक सावंतवाडी यांचे पत्र दिनांक 31.07.2025
:- वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करुन कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत. संदर्भ :- 1. मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-10(2)/आस्था/एक/प्र.क्र. (16-17) गणवेश/786, दि.01.10.2024 2. महाराष्ट्र क्रांती सेना कोल्हापूर यांचेकडील दि.23.06.2025 रोजीचे पत्र. उपरोक्त विषयांकित प्रकरणी वरिल संदर्भ क्र.2 अन्वये महाराष्ट्र क्रांती सेना कोल्हापूर यांनी वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करुन कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडे तसेच या कार्यालयाकडे केलेली आहे. सदर तक्रार आपले कार्यक्षेत्रातील अधिनस्त कर्मचारी यांचे निदर्शनास आणून द्यावी. तसेच सदर तक्रारीच्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल सर्व यांना सूचित करण्यात येत आहे की, संदर्भ क्र.1 अन्वये मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी निर्गमित केलेल्या गणवेशाबाबतच्या सुचनांचे पालन करावे. तसेच आपले अधिनस्थ कर्मचारी (गणवेश परिधान करणारे) यांनाही सदरच्या गणवेशाबाबत दिलेल्या सूचना निदर्शनास आणून देऊन त्याचे पालन करणेस सांगावे. जेणेकरुन आपल्या विभागाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
0 Comments