MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करून कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत

वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक हे बेकायदेशीर नियमबाह्य गणवेश परिधान करून कायद्याची पायमल्ली करत असलेबाबत..उप वनसंरक्षक (प्रा) कोल्हापुर यांचे पत्र दिनांक 10.07.2025




विषय: वन विभागातील  गणवेशासंदर्भातील नियमांचे पालन – सूचना

संदर्भ:
1. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र दिनांक 01.10.2024.
2. महाराष्ट्र क्रांती सेना, कोल्हापूर यांची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व या कार्यालयाकडे सादर केलेली.
---
वरील विषयांतर्गत व संदर्भानुसार, महाराष्ट्र क्रांती सेना, कोल्हापूर यांनी वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी – वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक हे नियमानुसार न ठरवलेला, बेकायदेशीर व नियमबाह्य गणवेश परिधान करीत असून, त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत, संदर्भ क्र. 1 नुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी गणवेशासंदर्भात निर्गमित केलेल्या स्पष्ट सूचनांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने, सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल , वनरक्षक यांना सूचित करण्यात येते की:
1. गणवेशासंदर्भातील फक्त अधिकृत आणि मंजूर केलेल्या स्वरूपाचाच वापर करावा.
2. आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना याबाबत त्वरित सूचना द्याव्यात.
3. कोणताही कर्मचारी नियमबाह्य व भिन्न प्रकारचा गणवेश परिधान करत असल्यास, त्याची तात्काळ दखल घ्यावी व सुधारणा घडवून आणावी.
4. भविष्यात अशा प्रकारची तक्रार प्राप्त होणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी.
वन विभागाची शासकीय प्रतिमा व प्रतिष्ठा अबाधित राहावी, याकरिता सर्व संबंधितांनी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.


महाराष्ट्र वन विभाग
वन कर्मचारी गणवेश
नियमबाह्य गणवेश
वनपाल गणवेश नियम
प्रधान मुख्य वनसंरक्षक सूचना
वन विभाग आदेश
गणवेश तक्रार
कोल्हापूर वन विभाग
वनरक्षक अधिकृत गणवेश
वन विभाग नियमावली


 

Post a Comment

0 Comments