MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनहक्क अधिनियम 2006 कलम 3(2) अंतर्गत वनजमीन वळतिकरण्याबाबतचे महत्त्वाचे FAQs (Frequently Asked Questions / वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

  वनहक्क अधिनियम 2006 कलम 3(2) अंतर्गत वनजमीन वळतिकरण्याबाबतचे महत्त्वाचे FAQs (Frequently Asked Questions / वारंवार विचारले जाणारे प्रश्न) 

---

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

---

प्रश्न 1: वनहक्क अधिनियम 2006 च्या कलम 3(2) अंतर्गत कोणत्या प्रकल्पांसाठी वनजमीन वळवता येते?

उत्तर:

१) (क) शाळा

२) (ख) दवाखाणा किंवा रुगणालय

३) (ग) आंगणवाड्या

 ४) (घ) रास्त धान्य दुकाने

५) (ड) विद्युत व दुरसंदेशवाहक तारा 

६) (च) टाक्या किंवा अन्य गौन जलाशये

७) (छ) पिण्याचा पाण्याचा पुरवठा व जलवाहिन्या 

८) (ज) पाणी किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीची संरचना

९) (झ) लहान सिंचन कालवे

१०) (त्र) अपारंपारीक उर्जा साधने 

११) (ट) कौशल्य वाढ करणारी किंवा व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे

१२) (ठ) रस्ते आणि 

१३) (ड) सामाजीक केंद्रे

---

प्रश्न 2: वनजमीन वळवण्यासाठी जास्तीत जास्त किती जमीन वापरता येते?

उत्तर:
प्रत्येक प्रकल्पासाठी 1 हेक्टर पेक्षा कमी वनजमीन वापरण्याचीच परवानगी आहे.
---

प्रश्न 3: किती झाडे तोडण्याची परवानगी आहे?

उत्तर:
प्रत्येक हेक्टरमागे 75 झाडांपेक्षा जास्त झाडांची तोड करता येणार नाही.
---

प्रश्न 4: ग्रामसभेची भूमिका काय आहे?

उत्तर:
ग्रामसभा ही केंद्रबिंदू आहे. प्रत्येक प्रस्ताव ग्रामसभेच्या मंजुरीनंतरच पुढे पाठवला जाऊ शकतो. ग्राम सभेला किमान 50% सदस्यसंख्या उपस्थित असणे आवश्यक आहे.
---

प्रश्न 5: प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया काय आहे?

उत्तर:
User Agency ने Form-A भरून ग्रामसभेला सादर करावे → ग्रामसभा मंजुरी देईल → RFO पाहणी करेल → DFO / DCF अंतिम मंजुरी देईल → आवश्यकता असल्यास जिल्हास्तरीय समिती अंतिम निर्णय घेईल.
---

प्रश्न 6: RFO आणि DFO यांची काय भूमिका आहे?

उत्तर:
RFO (Range Forest Officer): स्थळ पाहणी करून Form-B मध्ये शिफारस करतो.
DFO (Divisional Forest Officer): अंतिम निर्णय घेऊन मंजुरी देतो किंवा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवतो.
---

प्रश्न 7: जिल्हास्तरीय समिती कधी निर्णय घेते?

उत्तर:
जर DFO / DCF प्रस्तावास मंजुरी देत नसेल, तर जिल्हास्तरीय समिती अंतिम निर्णय घेते.
---

प्रश्न 8: वळवलेली जमीन दुसऱ्या उद्देशासाठी वापरता येईल का?

उत्तर:
नाही. ती जमीन फक्त ठराविक उद्देशासाठीच वापरता येते. अन्यथा, एक वर्षात काम न झाल्यास जमीन वनविभागाकडे परत जाते.
---

प्रश्न 9: वृक्षतोड केल्यावर वृक्षारोपण करावे लागते का?

उत्तर:
हो. User Agency ने तोडलेल्या झाडांपेक्षा किमान दुप्पट वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे, आणि 5 वर्षांपर्यंत त्यांचे संरक्षण खर्च द्यावा लागतो.
---

प्रश्न 10: वनजमीन वळती प्रक्रियेचा अहवाल कोण पाठवतो?

उत्तर:
DFO दर तिमाहीत अहवाल  नोडल अधिकाऱ्यास पाठवतो. ते पुढे आदिवासी कल्याण व पर्यावरण मंत्रालयास सादर केले जातात.

---
प्रश्न 11: FRA कलम 3(2) अंतर्गत RFO ची भूमिका काय आहे?

उत्तर:
Range Forest Officer (RFO) हा FRA 2006 च्या कलम 3(2) अंतर्गत प्रस्तावांची प्राथमिक स्थळ पाहणी, शिफारस, आणि Form-B भरून DFO कडे पाठवण्याचे काम करतो.
---

प्रश्न 12: RFO प्रस्तावास किती कालावधीत पाठवतो?

उत्तर:
RFO ने पूर्ण प्रस्ताव मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत आपली शिफारससह अहवाल DFO कडे सादर करणे आवश्यक आहे.
---

प्रश्न 13: RFO कडून स्थळ पाहणी करताना कोणते मुद्दे पाहिले जातात?

उत्तर:
जमीन व स्थानाची अचूकता (सर्व्हे/कंपार्टमेंट क्रमांक)
जैवविविधता व संवेदनशीलता (उदा. टायगर रिझर्व, एलिफंट कॉरिडॉर इ.)
झाडांची संख्या व आवश्यक वृक्षतोड
पर्यायी ठिकाणांचा अभ्यास
स्थानिक ग्रामसभेचा ठराव
---

प्रश्न 14: RFO वनक्षेत्रपाल काय निर्णय देऊ शकतो?

उत्तर:
RFO प्रस्तावावरील स्वतःची स्पष्ट शिफारस देतो:
स्वीकृत / अस्वीकृत कोणता पर्याय अधिक योग्य आहे (जर दोन पर्याय सुचवले असतील) हा निर्णय तो Form-B मध्ये लिहून देतो.
---

प्रश्न 15: RFO ला Gram Sabha ठरावाची खातरजमा करावी लागते का?

उत्तर:
हो. Gram Sabha चा ठराव वैध आहे का, सभेचा कोरम पूर्ण आहे का, प्रस्ताव खरेच ग्रामसभेत मांडला गेला का, याची खातरजमा RFO पाहणी दरम्यान करतो.
---

प्रश्न 16: RFO जमीन कोणाला हस्तांतरित करतो?

उत्तर:
DFO / DCF  कडून मंजुरी मिळाल्यावर RFO संबंधित जमीन ग्रामसभेच्या उपस्थितीत User Agency कडे हस्तांतरित करतो.
---

प्रश्न 17: RFO कोणत्या फॉर्ममध्ये माहिती भरतो?

उत्तर:
RFO Form-B मध्ये संपूर्ण माहिती, शिफारस, आणि स्थळ पाहणी अहवाल भरतो.
------ 

प्रश्न 18: FRA 3(2) अंतर्गत "User Agency" म्हणजे काय?

उत्तर:
"User Agency" म्हणजे राज्य किंवा केंद्र सरकारचे खाते, किंवा जिल्हा परिषद, जी FRA कलम 3(2) अंतर्गत विकास प्रकल्पासाठी वनजमीन वळविण्याचा प्रस्ताव सादर करते.
---

प्रश्न 19: User Agency ला काय प्रक्रिया पूर्ण करावी लागते?

उत्तर:
User Agency ने:
Form-A भरून तयार करावा
संबंधित ग्रामसभेकडे प्रस्ताव मांडावा
ग्रामसभा ठराव मिळाल्यावर तो RFO कडे सादर करावा
---

प्रश्न 20: User Agency ने किती पर्याय सुचवावे लागतात?

उत्तर:
प्रत्येक प्रकल्पासाठी किमान दोन पर्यायी स्थळांचे पर्याय प्रस्तावात नमूद करणे आवश्यक आहे.
---

प्रश्न 21: User Agency ला वृक्षारोपण करण्याची जबाबदारी असते का?

उत्तर:
हो. User Agency ने तोडल्या जाणाऱ्या झाडांपेक्षा दुप्पट झाडे लावणे व 5 वर्षे संरक्षणासाठी निधी देणे बंधनकारक आहे.
---

प्रश्न 22: प्रकल्प सुरू न झाल्यास काय होते?

उत्तर:
जर 1 वर्षात प्रकल्प सुरू न झाल्यास, जमीन वनविभागाकडे परत जाईल.
---

प्रश्न 23: FRA 3(2) अंतर्गत DFO ची भूमिका काय असते?

उत्तर:
DFO /DCF हा अंतिम मान्यता देणारा अधिकारी आहे. RFO कडून आलेल्या प्रस्तावावर तो चौकशी करून मंजुरी/नामंजूरी देतो किंवा जिल्हास्तरीय समितीकडे पाठवतो.
---

प्रश्न 24: DFO / DCF किती दिवसांत निर्णय घेतो?

उत्तर:
DFO /DCF ने RFO कडून प्रस्ताव मिळाल्यापासून चार आठवड्यांत निर्णय घेणे आवश्यक आहे.
---

प्रश्न 25: जर DFO प्रस्ताव नाकारतो, तर पुढे काय होते?

उत्तर:
DFO जर प्रस्ताव नाकारतो, तर तो जिल्हास्तरीय FRA समितीकडे अंतिम निर्णयासाठी पाठवतो.
---

प्रश्न 26: DFO ने मंजुरी दिल्यावर पुढील टप्पा कोणता?

उत्तर:
DFO मंजुरी दिल्यानंतर ती RFO व जिल्हास्तरीय FRA समिती अध्यक्षाला कळवतो आणि मग RFO जमीन User Agency कडे हस्तांतरित करतो.
---

प्रश्न 27: DFO /DCF चा अहवाल कोणाकडे पाठवावा लागतो?

उत्तर:
DFO प्रत्येक तिमाहीला नोडल अधिकाऱ्यास अहवाल पाठवतो, जो पुढे आदिवासी कार्य मंत्रालय व पर्यावरण मंत्रालयास सादर केला जातो.
---

प्रश्न 28: FRA अंतर्गत मंजूर जमीन DFO दुसऱ्या कामासाठी वापरास परवानगी देऊ शकतो का?

उत्तर:
नाही. FRA 3(2) अंतर्गत वळवलेली जमीन फक्त ठराविक उद्देशासाठीच वापरता येते. अन्य वापर केल्यास ती जमीन वनविभागाकडे परत जाते.


Post a Comment

0 Comments