MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनगुन्हा अन्वेषणाच्या अनुषंगाने झडतीची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या झडती वॉरंट (Search Warrant) आणि झडतीसाठी पंच आमंत्रण नोटीस व इतर आवश्यक कागदपत्रे

नमस्कार

मी सागर वाकचौरे ( Sagar Wakchaure )आपणास कळवू इच्छितो की, वनगुन्हा अन्वेषणाच्या अनुषंगाने झडतीची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या झडती वॉरंट (Search Warrant) आणि झडतीसाठी पंच आमंत्रण नोटीस यांचे अधिकृत नमुने मी तयार केलेले आहेत. ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ही नमुने भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 73(1)(C) व 79(2), तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 185, 220 व 225 अन्वये तयार करण्यात आले आहेत. या नमुन्यांचा उपयोग वनसंपत्ती बेकायदेशीररित्या साठवणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या निवासस्थानी किंवा मालमत्तेवर झडती घेताना करावयाचा आहे. झडतीपूर्वी संबंधित घरमालक अथवा संशयितास लेखी नोटीस देणे व पंचांची कायदेशीर उपस्थिती सुनिश्चित करणे ही प्रक्रिया आवश्यक आहे.
सदर नमुन्यांद्वारे झडती व जप्ती कार्यवाही अधिक कायदेशीर, पारदर्शक व न्यायालयीन प्रक्रियेस अनुकूल राहील.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या नमुन्यांची प्रत स्वतःकडे ठेवून, संबंधित गुन्ह्याच्या तपासानुसार आवश्यक तपशील भरून योग्य तो वापर करावा.


सागर  वाकचौरे, Sagar Wakchaure 
वनरक्षक

कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🖇️ 


सदर कागदपत्रे आपल्याला माहिती साठी देण्यात आली आहे. त्याचा वापर आवश्यक असलेला बदल करून करण्यात यावा

Post a Comment

0 Comments