वन विभागाने जप्त केलेला रक्त चंदन सरकार जमा झाल्यानंतर लिलाव करण्याचे आदेश झाल्यावर सदर रक्तचंदनाची प्रतवारी करून A, B, C, N, P patta log असे ग्रेड पाडले जातात त्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे
A ग्रेडचा रक्तचंदन
१. या ग्रेडचा रक्तचंदन नग हा सरळ गडद चॉकलेटी रंग असतो
२. हातोडीने नगावर ठोकले असता मेटालीक आवाज उत्पन्न होतो.
३. या लागडाच्या ग्रेन्स या विनकाम प्रमाणे असतात. (weave grains golden stick)
४. या नगाचा आकार जाड, सरळ, गाठी विरहीत असतो.
B ग्रेड रक्तचंदन
1. या ग्रेडचा रक्तचंदन नग हा सरळ गडद चॉकलेट रंग असतो.
२. या रक्तचंदन नगास गाठी व बेंन्ड् असतो.
३. हतोडीने नगावर ठोकले असता मेटालीक आवाज उत्पन्न होतो.
४. या रक्तचंदन नगावर पांढरे पॅच असतात.
C ग्रेडचा रक्तचंदन
१. या ग्रेडचा रक्तचंदन नगाचा रंग हलका तपकेरी असतो.
२. पोकळ, मुंगार, गाठी व पांढरे पॅच असतात.
३. मेटालीक आवाज उत्पन्न होत नाही.
N ग्रेडचा रक्तचंदन
१. या ग्रेडचा रक्तचंदन नगाचा रंग कालपट असतो.
२. सदरील माल हा पुर्ण पणे वाकडा, गाठी असलेला, फाटलेला असतो
३. नगाचा आकार छोटा व वाकडा असतो.
P (Patta Log) ग्रेडचा रक्तचंदन
१. सदरील माल हा खाजगी मालकी क्षेत्रात लागवड केलेल्या रक्तचंदन वृक्षाचा असतो.
२. या नगाचा रंग फिक्कट तपकेरी असतो.
३. या नगाचा आवाज मेटालीक येतो परंतु रंग हा फिक्क्ट तपकेरी असल्याने यास A to C ग्रेडमध्ये घेतले जात नाही.
0 Comments