अटल बांबू समृध्दी योजना
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर
अटल बांबू समृध्दी योजना उद्दीष्टेः
१) शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला जोड देण्यासाठी शेत जमिनीवर बांबू लागवड करणे.
२) बांबू लागवडीमुळे शेतक-यांस उपजिवीकेचे साधन निर्माण करणे होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे. व शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा
३) भविष्यात बांबू संसाधनाच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित असल्याने बांबू संसाधन वाढविणे.
४) बांबूपासून चिरकाल उत्पन्न घेऊन पर्यावरणास सुध्दा पूरक योगदान प्रदान करणे.
५) शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबूची रोपे ज्या मध्ये 3 स्थानिक प्रजातीची रोपे तसेच जास्त उत्पन्न देणारी 5 प्रजाती पुरवठा करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आहेत.
६) स्थानिक 3 प्रजाती मानवेल (Dendrocalamus strictus), कटांग (Bambusa bambusa), माणगा/ मेस (Oxytenenthara stocksii)
७) इतर 5 प्रजाती Bambusa balcooa, Dendrocalamus brandisii, Bambusa nutan, Dendrocalamus asper हया 4 प्रजाती मोठे बांबूच्या जाती आहेत व Bambusa tulda मध्यम आकाराचा बांबू आहे.
अटल बांबू समृध्दी योजना बांबूची वैशिष्ट्येः
१) बांबू वनस्पती हि गवत प्रजाती असल्याने कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते.
२) बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 60 वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
३) बांबूला कमी, जास्त किंवा अवकाळी पाऊस पडल्याने शेतीसारखे बांबूचे नुकसान होत नाही.
४) क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवरसुध्दा बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते.
५) बांबू लागवडीमुळे शेतजमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा फायदा मिळू शकतो.
६) बांबूला सर्वसाधारण रोग अथवा किटकांपासून वाचविण्यासाठी फवारणी इत्यादी आवश्यकता नाही.
७) बांबू बेट तयार झाल्यावर प्रत्येक वर्षी नविन बांबू निर्माण होतात व त्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत जाते.
बाबू लागवडीचे फायदे
१) बांबू लागवड केल्यामुळे शेतातून मिळणा-या उत्पन्नाला शाश्वत जोड मिळते.
२) बांबू बेटे तयार झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नसल्याने शेतीच्या तुलनेत बांबू उत्पन्नाचा खर्च खुप कमी असतो.
३) बांबू लागवड केल्याने जमिनीची सुपिकता वाढते तसेच पाण्याचे सुध्दा संवर्धन होते.
४) बांबूपासून शेतक-यांना वेळोवेळी शेती कामासाठी लागणारी अवजारांसाठी बांबू सहज उपलब्ध होऊ शकतात.
४) बांबू ग्रामीण भागामध्ये घरगुती तसेच घराभोवती लागणार वस्तू तयार करण्यासाठी वापरला जातो ज्यामुळे ग्रामीण भागात जीवन सुलभ होते.
५) बांबूचे इतर वापर विचारात घेतल्यास बांबू संसाधनाची मागणी भविष्यात खुप वाढणार आहे. त्यामुळे शेतक-यांना त्याचा निश्चित लाभ होईल.
अटल बांबू समृध्दी योजनेच्या लाभार्थी निकषः
१) लाभार्थी हा भुमीधारक असावा.
२) लाभार्थींची जमीन 10 एकर पर्यंत असल्यास त्याला 80 टक्के सबसीडी दराने बांबू रोपे पुरविली जातील.
३) लाभार्थीची जमीन 10 एकर पेक्षा जास्त असल्यास त्याला 50 टक्के सबसीडी दराने बांबू रोपे पुरविली जातील.
४) लाभार्थ्यांनी रोपांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारावे तसेच पावसाळ्यानंतर ठिबक सिंचनची व्यवस्था करून रोपांना पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी.
अटल बांबू समृध्दी योजना लाभार्थ्यांनी अर्जा सोबत सादर करावयाची कागदपत्रे
१) शेतीचा गावनमुना ७/१२, गावनमुना ८ व गावनकाशाची प्रत
२) ग्रामपंचायत / नगर परिषद / नगर पंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला. आधारकार्डाची प्रत बँक खात्याचे तपशिल व पासबुकची प्रत/ को-या धनादेशाची छायांकीत प्रत अर्जदाराने त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले हवे शेतामध्ये विहिर / बोअरवेल / शेततळे असल्याबाबतचे विहित प्रपत्रात हमीपत्र बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करणे संदर्भित विहित प्रपत्रात हमीपत्र. ज्या शेतजमिनीवर / शेताच्या बांधावर लागवड करावयाचे आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.
टिपः अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीनेसुध्दा अर्ज करता येऊ शकतो किंवा स्थानिक वनक्षेत्रपालांकडून अर्जाचे विहित प्रपत्र प्राप्त करुन अर्ज भरुन परत वनक्षेत्रपाल यांचेकडे सादर करावा.
0 Comments