MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन अपराधाचे पहिले प्रतिवृतास ( POR) सुधारित प्रपत्रास मान्यता शासन निर्णय दिनांक.25.01.2021

वनगुन्हयाशी संबंधित "वन अपराध पहिले प्रतिवृत्ताचे ( POR)  सुधारीत प्रपत्रास मान्यता मिळणेबाबत.


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- टिआरएस-१२/२०२०/प्र.क्र.२०३/फ-६मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २५ जानेवारी, २०२१

वाचा :- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष- १८ / दक्षता / सांखिकी / प्रक्र २३/२०२०-२१/३४४ दिनांक १४.१२.२०२०.
शासन निर्णय :

वन अपराध नोंदविण्यासाठी वनविभागात "वन अपराध पहिले प्रतिवृत्त" या सदराखाली प्रपत्र उपयोगात आणले जाते. या प्रपत्रास काही ठिकाणी FOR (First Offence Report) तर काही ठिकाणी POR (Preliminary Offence Report) म्हणून संबोधले जाते. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील (कलम २(c) आणि १५४ मधील तरतुदींचे एकत्रपणे विचार करता, POR / FOR आणि FIR (First Information Report) यांची एकमेकाशी तुलना करणे अभिप्रेत नाही. मात्र वन अपराधाशी संबंधित पुढील न्यायिक प्रक्रिया किंवा अर्ध न्यायिक प्रक्रिया तांत्रिकदृष्टया सुरळीतपणे चालविण्यासाठी तसेच वन अपराध प्रकरणाबाबत प्रभावी संनियंत्रण ठेवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले सदर वन अपराध पहिले प्रतिवृत्त (POR) या प्रपत्रातील माहिती अचूकपणे भरली जाणे अपेक्षित आहे. सध्याचे प्रपत्र हे सुमारे ८० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अंमलात आहे. तेव्हा वनसंरक्षणाबाबतीत भारतीय वन अधिनियम, १९२७ हाच कायदा प्रामुख्याने अंमलात होता. कालानुरूप उक्त अधिनियमात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली तसेच त्याअंतर्गत नियमावलीसुध्दा अद्ययावत करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ व वन (संवर्धन) अधिनियम, १९८० इत्यादी कायदे सुध्दा लागू झाले. त्याअंतर्गत तरतुदी विरुध्द घडणाऱ्या अपराधांबाबत नोंद सुध्दा POR मध्ये केली जात आहे. 
गुन्हा प्रतिवृत्त, हा घडलेल्या गुन्हयाबद्दल अचूक तपशील दर्शविणारे, तसेच गुन्हयाबाबतचे पुढील अन्वेषण, चौकशी, तसेच अर्धन्यायिक व न्यायिक कार्यवाहीस दिशा प्रदान करणारा दस्ताऐवज असल्याने, वन अपराध पहिले प्रतिवृत्त प्रपत्र अद्ययावत करणे आवश्यक असल्याने त्यात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने आता वनगुन्हयातील सध्याचे "वन अपराध पहिले प्रतिवृत्त" या प्रपत्रात सुधारणा करुन सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ प्रमाणे नवीन प्रपत्रास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
 सोबत सहपत्रित परिशिष्ट - अ प्रमाणे वन अपराध पहिले प्रतिवृत्ताची छपाई आणि क्षेत्रीय स्तरावर पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांनी करावी.. 
 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२१०१२५१७३३५५२११९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
                                    sd
(गजेंद्र नरवणे) 
उप सचिव (वने), 
महसूल व वन विभाग



वन अपराध पहिले प्रतिवृत्त pdf | वन अपराध पुस्तिका pdf | वन गुन्हा प्रतिवृत pdf | POR pdf | FOR First Offence Report | POR Preliminary Offence Report | FOR First Offence Report pdf | Forest offence book pdf | 


Post a Comment

0 Comments