महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31 - वन-उपजाची वाहतूक
महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31 - वन-उपजाची वाहतूक पासाने विनियमन करणे.
(१) या नियमानुसार प्राधिकृत अधिकारी किंवा व्यक्तीद्वारे परवाना प्राप्त केल्याशिवाय किंवा सदर परवान्यातील नमूद केलेल्या शर्ती, वाहतूकीचा मार्ग, वाहतूकीचे स्थळ इ. वगळून इतर प्रकारे कोणताही वन-उपज राज्याच्या जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यांतर्गत हलविता येणार नाही.
मात्र, खालील बाबींकरिता वाहतूक परवान्याची आवश्यकता राहणार नाही:-
(अ) बंदर, उतरविण्याचे स्थळ अथवा रेल्वेस्थानक वगळता -
(i) विशेष वन अधिकार किंवा अधिनियमाखाली किंवा इतर प्रचलित कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त हक्कांचे वापर करताना व्यक्तीद्वारे खाजगी वापराकरिता गावात उत्पादित झालेली व त्या गावातील हद्दीत काढण्यात येत असलेल्या कोणत्याही वन उपजाच्या बाबतीत :
(ii) जर नियम १० च्या उप-नियम ५ अनुसार परवाना मिळाला असेल तर विशेष वनअधिकार अथवा कायद्याने मान्य केलेला हक्क किंवा प्रचलित इतर कायद्यांद्वारे वास्तविक उपजीविका भागविण्यासाठी, जिथे तो कायम निवासी आहे. तिथे आणि कुठल्याही गावाचे हद्दीत येत नसलेल्या राखीव वनातून मिळालेला कोणताही वन-उपज खाजगी वापरासाठी हलविणे; आणि
(iii) वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पूर्व लेखी सूचना दिली असल्यास, कोणतेही वन उपज जे शासनाची मालकी नसलेल्या जमिनीतून मिळाले आहे, त्यास गावाच्या हद्दीत हलविणेसाठी;
(iv) राखेचे खत तयार करण्यासाठी डहाळया, पाने, खुरटी, झुडपी आणि गवत;
(v) विभागाच्या तोडीतून फक्त खाजगी वापरासाठी दिलेला लहान फांद्यांचा वापर करण्यासाठी;
(ब) बंदर, उतरविण्याची जागा, रेल्वेस्थानक किंवा राज्य शासनाने वेळोवेळी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सूट नसणारे क्षेत्र वगळता जळाऊ लाकूड म्हणून वापरण्याकरिता, ज्यांचा सर्वात जाड भाग 10 सें.मी. पेक्षा जास्त वेढीचा नाही, अशा फांद्या, गवत किंवा पाने, जी संपत्ती एका व्यक्तीची किंवा दोन अथवा तीन व्यक्तींची समाईक संपत्ती असेल, त्यास 24 तासात एक शिरओझा पेक्षा जास्त नसेल;
(क) कुठलेही इमारती लाकूड, ज्याला कायदेशीर स्थापित आरा गिरणीवर सर्व बाजुंनी कापण्यात आलेले आहे आणि ज्याचे सोबत रोखीचे टिपण, पावती, कर-बीजक (Tax invoice) अथवा आरा गिरणीधारक किंवा त्याच्या प्राधिकृत अभिकर्त्याने, ज्यावर आरा गिरणीचे नाव, अनुज्ञप्ती क्रमांक स्पष्टपणे छापलेला आहे, आणि इमारती लाकडाची जात, आकारमानानुसार हलविण्यात येणाऱ्या लाकडांचे परिमाण, ज्यास असे लाकूड पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव आणि पूर्ण पत्ता, तारीख, जारी केल्याचे ठिकाण, आरा गिरणीधारक अथवा त्याच्या प्राधिकृत अभिकर्त्याचे नाव आणि सही, कापीव लाकूड जर 2 मीटर लांबीपेक्षा जास्त आणि एकत्रित 15 सें.मी. जाडीपेक्षा जास्त असेल आणि त्यावर उप वनसंरक्षक यांनी पुरवठा केलेले ओळख चिन्ह असेल अथवा नियम 47 नुसार नोंदणी केलेले संपत्ती चिन्ह उठविलेले असेल, यापैकी योग्य त्या हेतूकरिता योग्य आहे ते;
(ड) राज्य शासनाच्या संपत्तीचे कुठलेही वन-उपज, जे शासनाच्या प्राधिकारात हलविले जातात किंवा
(इ) राज्य शासनाने या प्रकरणातील नियमानुसार राजपत्रात अधिसूचित करून सूट दिलेले वन-उपज.
(3) ज्या वन-उपजाकरिता उप-नियम (1) अनुसार पासाची गरज नाही, त्यास वन-उपजाचा मालक किंवा यथास्थितीत जिथे अशा लाकडाची कटाई केली जात आहे, त्या आरा गिरणीचा मालक त्यास प्रकरणातील तरतुदीनुसार वन पास, देण्याचा विकल्प राहील :
स्पष्टीकरण. या नियमाच्या हेतूकरिता -
मर्यादा. १. "गावांच्या मर्यादा" याचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 यात असलेली व्याख्या व अधिसूचित केलेली गावाची
2. "गाव" यात नगर आणि शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या सर्व जमिनींचा समावेश होतो.
3. "राज्यशासनाच्या संपत्तीमध्ये" वन विकास महामंडळ मर्यादित च्या संपत्तीचा समावेश होतो.
वाचावे : महाराष्ट्र वन नियमावली 2014 चा नियम 79 येथे वाचा
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र.1: महाराष्ट्र वन नियमावली 2014 चा नियम 31 काय सांगतो?
उ. नियम 31 हा वन उपजाच्या वाहतुकीसंबंधी असून, कोणतीही वन उपज राज्याच्या आत किंवा बाहेर नेण्यासाठी वन विभागाकडून दिलेला परवाना (वन पास) आवश्यक असल्याचे स्पष्ट करतो
---
प्र.2: कोणत्या परिस्थितीत वन उपज वाहतुकीसाठी परवाना आवश्यक नाही?
उ. खाजगी वापरासाठी गावाच्या हद्दीत उत्पादित उपज, राखीव वनातील रहिवासींनी घेतलेली उपज, शासनाच्या मालकी नसलेल्या जमिनीतून मिळालेली उपज, तसेच राख तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डहाळ्या-पाने यासाठी परवाना आवश्यक नाही.
---
प्र.3: आरा गिरणीवरून हलविलेल्या लाकडासाठी कोणती कागदपत्रे बंधनकारक आहेत?
उ. कायदेशीररित्या कापलेले लाकूड असल्यास पावती, कर-बीजक (Tax Invoice), गिरणीचे नाव व परवाना क्रमांक, खरेदीदाराची माहिती, ओळख चिन्ह किंवा संपत्ती चिन्ह असणे आवश्यक आहे.
---
प्र.4: नियम 31 चे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होते?
उ. पासशिवाय वन उपज हलविल्यास ती कृती वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा ठरते. उपज, वाहन किंवा साधने जप्त केली जातात आणि संबंधित व्यक्तीवर दंड अथवा न्यायालयीन कारवाई होऊ शकते.
---
प्र.5: नियम 31 चा उद्देश काय आहे?
उ. या नियमाचा मुख्य हेतू म्हणजे वन संपत्तीचे संरक्षण, अनधिकृत वाहतूक रोखणे, तसेच शासनाच्या नियंत्रणाखाली वन उपज वाहतूक कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने करणे.

0 Comments