MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

'पंचनामा' म्हणजे काय?

पंचनामा म्हणजे काय?

 पंचनामा' या शब्दाचा अर्थ कायद्यात कोठेही नमूद नाही. तथापि, 'पंचनामा' या शब्दाला कायद्यात फार महत्व दिले जाते, बहुतांष सर्वच न्यायालये 'पंचनामा' वर अवलंबून असतात व त्या आधारे निकाल देतात. फौजदारी न्यायालयांत 'पंचनामा' चा उपयोग स्वतंत्र पुराव्याला आधार म्हणून तर दिवाणी न्यायालयांत पंचनामा' चा उपयोग आदेशाच्या अंमलबजावणीचा पुरावा म्हणून केला जातो.

'पंचनामा' हा शब्द 'पंच' आणि 'नामा' या दोन शब्दांनी तयार झाला आहे. संस्कृत भाषेत 'पंच' म्हणजे प्रतिष्ठीत व्यक्ती असा आहे. 'नामा' म्हणजे लिखित दस्त. थोडक्यात प्रतिष्ठीत व्यक्तींच्या समक्ष घटनेबाबत केलेला लिखित दस्त म्हणजे 'पंचनामा' घडलेल्या घटनेचे 'घटना चित्र' म्हणजे पंचनामा,

'पंचनामा ' बाबत कायद्यात तरतूद

'पंचनामा' या शब्दाचा अर्थ कायद्यात नमुद नसला आणि पंचनामा कसा करावा हे कायद्यात स्पष्ट

नमूद नसले तरी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १००, उपकलम (४) आणि (५) चे वाचन केल्यास पंचनाम्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते.

वन खात्यातही अनेक वेळा पंचनामा करण्याचा प्रसंग पंचनामा करतांना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

१. पंचनाम्यासाठी दोन किंवा अधिक सज्ञान व्यक्तींची पंच म्हणून आवश्यकता असते. अज्ञान व्यक्तींना पंच म्हणून घेण्यास कायद्याची मान्यता नाही. 

२. पंच म्हणून निवडलेल्या व्यक्ती प्रतिष्ठीत समाजात नाव आणि मान असलेल्या असाव्यात.

३. ज्या घटनेसाठी पंचनामा केला जात आहे त्या घटनेचा आणि पंचांचा व्यक्तिगत संबंध नसावा.

 ४. पंचनामा घटनास्थळावरच लिहावा.

५. ज्या घटनेसाठी पंचनामा केला जात आहे त्याबाबत पंचांना पूर्व कल्पना यावी..

 ६. पंचांना दृश्य / घटना दाखविल्यानंतर पंचनाम्यास लिहिण्यास सुरुवात करावी.

७. पंचनाम्याची सुरुवात आम्ही (पंचाची नावे, वय, पता, धंदा, फोन नंबर) यांना आज जागी दिनांक ........ /...../.....रोजी--..- वाजता (कोणी, कधी बोलावले ते नमूद करावे) बोलावले वरून (स्थळ नमूद करावे) हजर झालो आहोत. आम्ही पहात असलेल्या घटनेचे/ दृश्याचे वर्णन असे की,---

- (तपशील नमूद करावा) 

८. पंचनामा हा पंच स्वतः लिहीत आहेत असे समजून तशा भाषेत लिहावा..

९. पंचनाम्यात कधीही खाडाखोड करू नये. 

१०. पंचनामा एकाच रंगाच्या पेनने लिहावा. पंचनामा लिहिताना मधेच पेन बदलू नये.

११. पंचनाम्यात, पंचनामा करीत असलेल्या जागेचे सविस्तर वर्णन, खाणाखुणा, दिशांचा उल्लेख करावा.

१२. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करु नये..

१३. पंचनाम्यात पंचानी काय पाहिले याचा आणि जर काही वस्तू ताब्यात घेतल्या असतील तर त्यांचा सविस्तर उल्लेख करावा.

१४. पंचनाम्यात शेवटी हा पंचनामा वाजता सुरु करुन वाजता संपवला' असे नमूद करावे.

१५. पंचनाम्याच्या शेवटी सदर पंचनामा आमच्या समक्ष केला गेला असून तो आम्ही वाचून पाहिला किंवा तो आम्हाला वाचून दाखविण्यात आला आणि तो आम्हाला समजला असून तो आमच्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे' असे नमूद करावे. 

१६. पंचनाम्यावर उजव्या बाजूला पंचांच्या दिनांकित सह्या अनुक्रमाने घ्याव्यात,

१७. पंचनाम्यावर डाव्या बाजूला ज्याने पंचनाम्याचे आयोजन केले आहे त्या अधिकाऱ्याने 'समक्ष'असे लिहून त्याखाली वेळ आणि दिनांकासह स्वाक्षरी करावी आणि स्वतःचा शिक्का उमटवावा.

पंचनाम्याचे प्रकारः 

पंचनाम्याचे प्रसंगानुरूप अनेक प्रकार असू शकतात. उदाहरणार्थ: 

१. जप्ती पंचनामा (Seizure): वरिष्ठांच्या आदेशान्वये एखादी वस्तू जप्त करतांना जप्ती पंचनामा केला जातो. 

२. ताबा पंचनामा वरिष्ठांच्या / न्यायालयाच्या आदेशान्वये जागेचा ताबा देतांना किंवा घेतांना ताबा पंचनामा केला जातो.

३. मृत्युच्या कारणांचा पंचनामा ( Inquest): संशयास्पद मृत्यू, बेवारस प्रेत, हुंडाबळी, पोलीस कोठडीतील मृत्यू अशा अनेक बाबतीत कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने मृत्युच्या कारणांचा पंचनामा करावा लागतो. मयत व्यक्ती कशा परिस्थितीत आहे, त्याच्या अंगात कपडे आहेत की तो नग्न आहे, त्याच्या अंगावर काय जखमा आहेत किंवा कसे इत्यादी परिस्थिती दाखवण्यासाठी दोन लायक पंचासमक्ष मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करण्यात येतो. हा पंचनामा मयताच्या मृत्युचे कारण शोधून काढण्यासाठी केला जातो. या पंचनाम्याची प्रत ज्या वेळेस प्रेत शवविच्छेदनाला (post-mortem) पाठवले जाते त्यावेळेस सोबत पाठवली जाते.

 ४. नुकसानीचा पंचनामा (damage): नैसर्गिक आपती, जळीत, दंगल इत्यादी विविध कारणांमुळे शेताचे, पिकांचे, मिळकतीचे नुकसान झाले असल्यास नुकसानीचा पंचनामा करावा लागतो.

 ५. अनधिकृत गौणखनिज उत्खनन पंचनामा: परवानगीशिवाय गौणखनिजाच्या अनधिकृत उत्खननाचा प्रकार आढळल्यास हा पंचनामा करावा लागतो.

६. ओळख परेडचा पंचनामा: ओळख परेड म्हणजे एखादा साक्षीदार, ज्याने गुन्हा घडतांना आरोपीला पाहिले आहे, त्याने दंडाधिकारी व लायक पंचांच्या समक्ष गुन्हा घडतांना पाहिलेल्या आरोपीला ओळखणे, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६२ अन्वये पोलिसांसमोर दिलेल्या जबाबावर जबाब देणाऱ्याची स्वाक्षरी नसते. त्यामुळे न्यायालयात असा जबाब गृहित धरला जात नाही. त्यामुळे Criminal Manual (Criminal Rules made by the HIGH COURT JUDICATURE, BOMBAY) यातील भाग १ ( Arrest and Investigation) यातील परिच्छेद १६ मधील मार्गदर्शनानुसार कार्यकारी दंडाधिकारी यांना ओळखपरेड गेऊन पंचनामा करावा लागतो. अशाप्रकारे प्रसंगानुरूप अनेक प्रकारचे पंचनामे करावे लागतात.


वनविभागाचे महत्वाचे शासन निर्णय 🔗

भारतीय वन अधिनियम 1927 महत्वाच्या सुधारणा 🔗

वन विभागाचे स्थाई आदेश 🔗

Post a Comment

0 Comments