MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यासंदर्भात धोरण.. शासन परिपत्रक दिनांक 27.11.1997

 शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्या संदर्भात धोरण.. शासन परिपत्रक दिनांक 27.11.1997


राज्य शासनाच्या तसेच राज्य शासनांतर्गत असलेल्या निमशासकीय सेवकांच्या बदल्या या सर्वसाधारणतः वर्षातून एकदाच करण्यात याव्यात. अधिकारी/कर्मचा-यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता, या बदल्या मे महिन्यातच करण्यात याव्यात. मात्र खालील प्रकरणी या सर्वसाधारण धोरणास अपवाद करण्यात यावा.

(अ) सेवानिवृत्ती/पदोन्नती/राजिनागा इत्यार्दीमुळे रिक्त होणा-या पदांवरील नियुक्त्या,

(ब) पती पत्नी यांना एकत्रित ठेवण्याच्या धोरणानुसार असलेल्या बदल्या,

(क) जिथे अपवादात्मक परिस्थितीमुळे बदली करणे आवश्यक आहे, अशी सक्षम अधिका-यांची खात्री झाल्यास, मात्र तसे करताना तत्संबंधीची कारणे नमूद करण्यात यावीत.

गट-क मधील कर्मचा-यांच्या बदलीकरिता किमान सेवा कालावधी  | पती-पत्नी यांची बदली | पती-पत्नी एकत्रीकरण शासन निर्णय | मतीमंद मुलांच्या पालकांची बदली | जिल्हा परिषद आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांची बदली :


Post a Comment

0 Comments