MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

समुद्रातील दुर्मिळ प्रजाती मासेमारी जाळ्यात अटकल्यानंतर त्यांची सुटका करण्याकरिता मच्छिमारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात बदल करणेबाबत...शासन निर्णय 08.01.2021

मच्छिमारांनी सागरी प्रजातींचे रक्षण करण्याकरिता त्यांच्या जाळ्यांमध्ये अटकलेल्या दुर्मिळ प्रजातींची सुटका करण्याकरिता त्यांचे जाळे फाडून/कापून दुर्मिळ प्रजातीची सुटका केल्यास मासेमारी जाळ्याच्या नुकसान भरपाई पोटी त्या मच्छिमारास रू. २५,०००/- इतके अनुदान देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. आता (वाचा-२) येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई यांच्या पत्रात प्रस्तावित केल्याप्रमाणे मच्छिमारांना द्यावयाच्या अर्थसहाय्यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता प्रदान करत आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत सुरक्षित असलेल्या समुद्री प्रजाती

1)
कासवांच्या प्रजाती ऑलिव्ह रिडले कासव, ग्रीन सी कासव, लॉगर हेड कासव, हॉक्सबील कासव, पॉक्युपाईन रे (काटदेर पाकट)

आर्थिक वर्षात प्रथम अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.)  १२,५०० /- 

आर्थिक वर्षात दुसऱ्या वेळेच्या अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.)  १०,०००/-  

आर्थिक वर्षात तिसऱ्या अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.) ८,०००/-

2) व्हेल शार्क (बहिरी मासा), गॅन्जेटीक शार्क (खादर), पाँडेचरी शार्क, सॉ फीश (करवत मासा), जॅट गिटार फीश (लांजा), लेदरबॅक कासव, डॉल्फिन व व्हेल मासे (सर्व समुद्री सस्तन प्राणी) 

आर्थिक वर्षात प्रथम अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.) २५,००० /- 

आर्थिक वर्षात दुसऱ्या वेळेच्या अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.) २०,०००/-  

आर्थिक वर्षात तिसऱ्या अर्जासाठी जास्तीत जास्त भरपाईची रक्कम (रु.) १५,०००/-

तसेच एका आर्थिक वर्षात एका अर्जदाराला जास्तीत जास्त ३ वेळेस नुकसान भरपाई मिळू शकेल.

Post a Comment

0 Comments