महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत घ्यावयाच्या कामासंबंधात मार्गदर्शक सूचना... शासन परिपत्रक दिनांक 09.11.2011
महाराष्ट्र राज्यात सन १९७७ पासून रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. सदर योजना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अनेक वर्षापासून महत्त्वाचे योगदान होते. परंतु राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २००६ पासून सुरु झाल्यानंतर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात या कार्यक्रमांतर्गत सहभाग झालेला दिसत नाही, याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्राथमिक माहिती व योजनेची विहित कार्यपध्दती अद्यापही क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे ज्ञात झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाईन डिपार्टमेंटच्या भूमिकेबद्दल जून २०१० पासून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.
भविष्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग हे कार्यान्वीत यंत्रणा म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मूळ तत्वे व कार्यपध्दतीचा सारांश पुनश्च वन अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे. या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवितांना करणे आवश्यक आहे.
0 Comments