राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.. शासन निर्णय दिनांक 23.07.2018
June 28, 2025
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.. शासन निर्णय दिनांक 23.07.2018
शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी आंतररुग्ण आहे (In patient) आणि अंथरुणास खिळलेली आहे अथवा बालसंगोपन करण्यास असमर्थ आहे, हे पाहून प्रकरणपरत्त्वे तेवढ्या कालावधीची (180 दिवसाच्या कमाल मर्यादेत), बाल संगोपन रजा संबंधित पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय राहणार आहे. तसेच बाल संगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर, रजा कालावधीत पत्नीचा मृत्यु झाल्यास, पतीला उर्वरित कालावधीची बाल संगोपन रजा १८० दिवसांच्या कमाल मर्यादित अनुज्ञेय राहील. ३. बाल संगोपन रजेबाबत शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक 23.07.2018 मधील अटी व शर्ती या शासन निर्णयान्वये बाल संगोपन रजा घेणाऱ्या लाभार्थ्यांना लागू राहतील.
0 Comments