मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम १५(४) अन्वये स्वायत्त अधिकार असल्याबाबत.. शासन निर्णय दिनांक . 12.04.2017
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम 15(4) अन्वये मा. मुख्य मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती मा. राज्यपाल करतात, कलम १५/४) अन्वये गाहिती आयोगाच्या कामकाजाचे सर्वसाधारण अधीक्षण, संचालन व व्यवस्थापन हे गा. राज्य मुख्य गाहिती आयुक्त यांच्या ठायी निहित आहेत. गाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलग १५(३) अन्चये, राज्य माहिती आयोगासाठी उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय मर्यादेत, राज्य माहिती आयोगाच्या प्रशासनिक व आर्थिक बाबींचे निर्णय घेण्याचे अधिकार मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना आहेत व त्या
अधिकारांचा वापर ते अन्य प्राधिकरणाच्या निदेशांना अधीन न राहता करू शकतात. २. मा. राज्य माहिती आयुक्त यांच्या विनंतीस अनुसरून, राज्य माहिती आयोगाच्या प्रशासनिक व आर्थिक बाबींचे निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार असल्याबाबतची बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याकरिता सूचित करण्यात येते की, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम १५(४) अन्वये, राज्य माहिती आयोगाच्या प्रशासनिक व आर्थिक बाबींचे निर्णय घेण्याचे स्वायत्त अधिकार मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना आहेत न त्या अधिकारांचा वापर ते इतर प्राधिकरणाच्या निदेशांना अधीन न राहता करू शकतात. यासंदर्भात मा. राज्य
मुख्य माहिती आयुक्त यांना अन्य विभागप्रमुखांशी समतुल्य समजण्यात येऊ नये ३. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१७०४१२१२३८१७११०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
0 Comments