ज्ञानगंगा अभयारण्यामधून जाणाऱ्या बुलढाणा ते खामगांव राज्यमार्ग क्र. २४ या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वन्यप्रान्याच्या अधिवास व जिवितास धोका निर्माण झाला असल्याने पर्यायी रस्ता वापरण्याचे जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश दिनांक 16.07.2015
Saturday, December 30, 2023
ज्ञानगंगा अभयारण्यामधून जाणाऱ्या बुलढाणा ते खामगांव राज्यमार्ग क्र. २४ या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वन्यप्रान्याच्या अधिवास व जिवितास धोका निर्माण झाला असल्याने पर्यायी रस्ता वापरण्याचे जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश दिनांक 16.07.2015
ज्याअर्थी उपवनसंरक्षक, वन्यजीव अकोला यांनी बुलडाणा जिल्हयामध्ये अजिंठा पर्वत रांगा मध्ये यसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामधून जाणाऱ्या बुलढाणा ते खामगांव राज्यमार्ग क्र. २४ या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वन्यप्रान्याच्या अधिवास व जिवितास धोका निर्माण झाला आहे. मागील ५ ते ६ वर्षात या रस्त्याने याहनांच्या घडकेने अस्वल, रानमांजर, यानर, बिबट मादी तसेच लहान इतर वन्यप्राणी रात्रीच्या / पहाटेच्या वेळी अपघातात ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, यापुढे सुध्दा बिचट, अस्वलासारखे अनुसुची-१ मधील च जैविक विविधतेमधील महत्वाचे प्राणी अज्ञात वाहनांचे धडकेने ठार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जैवविविधतेचे जतन करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यामधून जाणारा बुलडाणा ते खामगांव राज्य मार्ग क्रमांक २४ ची वाहतूक रात्रीचे वेळेस बंद करण्यासाठी आदेश मिळण्याबाबत उपवन संरक्षक, वन्य जीव अकोला यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच अभयारण्यातील रस्त्यावर मध्ये मध्ये २ ते ३ कि.मि. अंतरावर / यळणावर गतिरोधक / बॅरीगेट लावण्याबायत प्रस्तावित केले आहे. त्याअर्थी उपवन संरक्षक, वन्य जीय अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार भारतीय यन अधिनियम, १९२७ चे कलम २५ तसेच मुंचई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३३ अंतर्गत शक्तीचा वापर करुन मी, जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा या आदेशाद्वारे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणान्या राज्य मार्ग क्रमांक २४ वरील रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या मार्गावरील वाहतूकीस रात्री १०.०० ते सकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंदी घालीत आहे. सदर कालावधीत वाहतूक रकाना ३ मध्ये दर्शविलेल्य अ.क्र.१ वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. रात्री १०.०० ते सकाळी ५.०० हा कालावधी वगळता उर्वरित कालावधीसाठी चाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहील. अभयारण्यातून जातांना वाहनांची वेग मर्यादा तासी २५ कि.मि. याप्रमाणे ठेवण्यात येत आहे. याहतुक बंद ठेवण्याची व चाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याची संपूर्ण जबाबदारी उपवन संरक्षक, वन्य जिय अकोला यांचेवर सोपविण्यात येत आहे.
0 Comments