माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत कोणतीही माहिती विचारल्यानंतर जो पर्यंत त्यावर अंतिम न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत.. शासन निर्णय दिनांक 25.08.2022
December 31, 2023
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत कोणतीही माहिती विचारल्यानंतर जो पर्यंत त्यावर अंतिम न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत.. शासन निर्णय दिनांक 25.08.2022
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत कोणतीही माहिती विचारल्यानंतर जो पर्यंत त्यावर अंतिम न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्याचे मा. राज्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई यांनी, माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १९ (८)(क) (चार) अन्वये आदेश दिले आहेत, मा. राज्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या सदर निर्देशानुषंगाने सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. २. माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत अर्जदाराकडून कोणतीही माहिती विचारल्यानंतर जो पर्यंत त्यावर अंतिम न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत विचारलेली माहिती सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात यावी, ३. उपरोक्त परिपत्रकातील तरतूदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, सार्वजनिक प्राधिकरणे तसेच सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तदनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करावे. Ankush kendre website
0 Comments