वन औद्याोगिक विकास महामंडळाची लवकरच स्थापना
महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) MIDC धर्तीवर राज्यात वन औद्याोगिक विकास महामंडळ (एमएफआयडीसी) MFIDC स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विधानसभा सदस्य व वन अधिकाऱ्यांची एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे २० टक्के ( ६१ हजार ७०९ चौ.कि.मी.) वनक्षेत्र आहे. विदर्भात वनक्षेत्र सर्वाधिक आहे. वनउपज आधारीत उद्याोगाला चालना देण्यासाठी वन औद्याोगिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. लाकूड फर्निचर व इतर उद्याोगांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्याशी निगगडीत मनुष्यबळ यांचे सक्ष्मीकरण करणे, यासाठी हे महामंडळ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
प्रायोगिक तत्वावर फर्निचर क्लस्टरसाठी नागपूर व वनौषधी व त्यावरील प्रक्रिया उद्याोक याकरिता चंद्रपूर या दोन्ही क्षेत्रामधील विस्तृत्व अभ्यास करुन एक नियोजन आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी विधानसभा सदस्य अशिष जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्यात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव व इतर वन अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
शासन निर्णय
0 Comments