मानव- गवा संघर्ष
गवा (Indian Gaur)....
हा आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये राहणारा नैसर्गिक अन्नसाखळीतील एक मुख्य प्राणी.....
1) ज्यांच मूळ घर हे जंगलच आहे.
2) त्यालाही माणसासारखी अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज आहे.
3) पाण्याची कमतरता ही फक्त माणसासाठी त्रासदायक असते असे नाही, तर हे वन्यजीवही त्याचे बळी पडतात.
4) पाण्यासाठी त्यांचीही वणवण होते, आणि ते आपल्या मानवीवस्तीपर्यंत येऊन पोहचतात.
5) अश्यावेळी मानवासोबत त्यांचा संघर्ष होण्याची शक्यता असते.
6) पण या स्थितीला मानव वन्यप्राणी संघर्षाचे रुप द्यायचे का मानव वन्यप्राणी सहजीवनाचे हे केवळ आपल्याच हातात आहे.
2) त्यालाही माणसासारखी अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज आहे.
3) पाण्याची कमतरता ही फक्त माणसासाठी त्रासदायक असते असे नाही, तर हे वन्यजीवही त्याचे बळी पडतात.
4) पाण्यासाठी त्यांचीही वणवण होते, आणि ते आपल्या मानवीवस्तीपर्यंत येऊन पोहचतात.5) अश्यावेळी मानवासोबत त्यांचा संघर्ष होण्याची शक्यता असते.
6) पण या स्थितीला मानव वन्यप्राणी संघर्षाचे रुप द्यायचे का मानव वन्यप्राणी सहजीवनाचे हे केवळ आपल्याच हातात आहे.
मानव- गवा संघर्ष होण्याची कारणे
1) संकुचित होणारी जंगले आणि तुटणारी जंगलांची संलग्नता है प्रमुख कारण आहे.
2) जंगलाभोवतीचे कुरणक्षेत्र नष्ट झाल्याने गवे जांगलापासून अधिक दूर येतात आणि लोकवस्तीपर्यंत पोहचतात.
3) जंगल आणि मानवीवस्ती हे भेद माणसाला माहीत आहेत, गव्यांना नाही.4) खाणकाम तसेच पवनचक्की अश्या प्रकल्पांमुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे उमाळे बंद पडतात.
5) बदलेली पीक पद्धत, जंगलाच्या आसपास पारंपरिक पिके सोडून नगदी पिकांची वाढ झाल्याने गव्यांना त्याचा अन्न आणि आसरा असा उपयोग होतो.
6) गव्यासारखा प्राणी हा फक्त जंगलातच रहावा, लोकवस्तीत त्याने येऊ नये अशी भावना या संघर्षाला जन्म घालते.
7) मानव वन्यप्राणी संघर्ष हा केवळ वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याने होतो असे नाही, तर जेव्हा जेव्हा मानव जंगलांवर अतिक्रमण करतो तेव्हाही होतो.
मानव- गवा संघर्ष होऊ नये म्हणून उपाय :-
1) गव्यासारखा प्राणी हा जंगलातच रहावा अशी अपेक्षा असेल तर आपण त्यांच जंगलही त्या पद्धतीने सुरक्षित आणि समृध्द ठेवलं पाहिजे.
2) गव्यांना आवडणाऱ्या कारवीसारख्या वनस्पतींचे जतन केले पाहिजे.
3) जंगलातील आणि जंगलाभोवतीच्या पाणवठ्यांचे संवर्धन केले पाहिजे.
4) गवे आकर्षित होणार नाहीत अश्या पिकांची लागवड ही जंगलांच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे.
5) जंगलाला एकदम लागून शेती करु नये, थोडे मोकळे अंतर ठेवावे. पाण्यासाठी गवे जर शेतात किंवा गावाकडे येत असतील तर जंगल आणि गाव यादरम्यान कृत्रिम पाणवठे तयार करावेत.6) शहरी भागात पाण्याच्या शोधात चुकून येणाऱ्या गव्यांना योग्य रीतीने सामोरे गेल्यास हल्ल्यासारख्या घटना आपण टाळू शकतो. यासाठी गवा आलेल्या भागात नागरिकांनी गर्दी करणे टाळावे.
7) फोटो-व्हिडिओ काढणे टाळावे तसेच हे फोटो समाज माध्यमावर प्रसारित करुन विनाकारण गर्दी वाढवू नये.
8) आरडाओरडा केल्याने गवा बिथरून हल्ला करु शकतो, त्यामुळे शक्य तेवढी शांतता राखावी.
9) गव्याचा वावर असणाऱ्या परिसरात रात्री फिरणे झाले तर मोठ्याने बोलत अथवा आवाज करत फिरावे. या आवाजामुळे गवा जवळपास असेल तर दूर जाण्याचा प्रयत्न करतो.10) जंगलाच्या दिशेने जाणारा मार्ग गव्यांसाठी मोकळा करुन द्यावा, तिथे गर्दी करु नये..
11) शहारानजीक गवा दिसताच त्वरीत वनविभागाला सूचित करावे. त्याकरिता 1926 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा व दुरुन शांतपणे गव्यावर लक्ष ठेवावे.

0 Comments