MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन्यजीवांमध्ये मुंगीचे अनन्य साधारण महत्व

 वन्यजीवांमध्ये मुंगीचे अनन्य साधारण महत्व


वन्यजिवामध्ये मुंगी ही दुर्लक्षीत आहे. पण हिला दुर्लक्षीत करुन चालणार नाही. मुंग्या या अनेक जातीच्या आहेत. लाल , काळी, पांढरी, पाद्रमुंगी, तेलमुंगी, मुंगळा, उधळी एवढेच माहित होते पण प्रत्याक्षात मुंगाच्या दहा हजार जाती आहेत. पावसाळी प्रदेश व वाळंवटी प्रदेशमध्ये मुंग्या आहेत. फक्त दक्षिण धृवीय प्रदेशात आणि उत्तर ध्रुवीय वर्तुळात मुंग्या आढळत नाहीत. किमान ९ कोटी वर्षापूर्वी पासुन मुंग्या पृथ्वीवर अस्तित्वार आहेत. प्रत्येक वन्यजीवांना अन्न व निवाऱ्याची अत्यंत गरज असते. पण प्रत्येकाचे, अन्न व निवारा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यात मुंग्याहि आल्याच मुंग्याच्या निवान्याला मुंग्याचे वारुळ संबोधितात हे बांधण्याचे कसबहि वेगवेगळ्या जातीच्या मुंग्याचे भिन्न भिन्न असलेले दिसुन येते. हे वारुळ प्रत्येक अभयारण्यामध्ये जमिनीवर किंवा झाडावर वेगवेगळी असलेली दिसुन येते. काही जमिनिवर उंच उंच टोकदार भिंती बांधुन वारुळ तयार करतात. काही जमिनीवर वारुळ तयार करतात. जमिनिवर पण टेकडी तयार करून वर गोल, गोल अनेक छिद्र ठेवतात, काही झाडाच्या फादीवर अगदी झुंबर लटकविल्या प्रमाणे वारुळ बांधतात. ते कुठेहि बांधो पण मानवाला विचार पडावा असे ही वारुळाची रचना अचीवंत करणारी निचीत आहे.


मुंग्यापासुन मानवाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. मुंग्याचे संघटन कौशल्य, संकलन कौशल्य, त्याच प्रमाणे उत्कृष्ट असे मॉडेल होय. त्याच प्रमाणे हे दिशादर्शकहि आहे. त्याच प्रमाणे हे दिशादर्शकहि आहे. त्याचे असे की या वारुळाचे तोंड हे पुर्वेकडे उतार काढलेला असतो. अभारण्यामध्ये आपण भटकंतीला गेलो आणि दिशा विसरलोतर वारुळ शोधुन आपण आपली दिशा ठरवु शकतो. आपण कोणत्या दिशेकडुन आलो आणि आपल्याला कोणत्या दिशेकड जायचे आहे. अचुक समजेल म्हणजे वारुळ दिशादर्शक आहे. या वारुळाची रचना चक्रव्युहा सारखी आहे. म्हणजे शत्रु या वारुळामध्ये जाउ शकत नाही. ते ऐवढे गुळगुळीत असते. कि पाण्याच्या एक थेंब जरी पडला तरी मो घरंगळत बाहेर फेकला जातो. म्हणजेच पावळ्यात सुध्दा हे वारुळ टिकूण राहते. पावळ्यात मुंग्याना बाहेर पडायचे असल्यास त्या वारुळावर काळया रोहतात पावसाचे पाणी वारुळावर आले कि या काळ्याच्या पुलासारख्या उपयोग त्या घराबाहेर पडण्यासाठी करतात. या वारुळामध्ये ८ हटस असतात. म्हणजेच ३मीटर पर्यंत आत हे वारुळ खोल पसरलेले असते. त्यामुळे अभयारण्यामध्ये उकरी द्यायचे काम मुंग्या कडुन होत असते. त्यात राणी मुगी सर्वात आत पहाकरी अंडी ठेवायसाठी, अळी ठेवायचे दालन असे वेगवेगळे दालन असतात. प्रत्येक वारुरामध्ये एकतरीसाठी मुंगी असते. हि आकाराने इतर मुंगी पेक्षा थोडी मोठी असतात. ती सतत अंडी द्यायचे काम करते. कष्टकरी मुंग्या राणी मुंगीची काळजी घेतात. शिपाई मुंग्या हया लढावु असतात म्हणुन त्याचेस्थान वारुळाच्या तोंडाशी असलेल्या दालनात असते. या वारुळामध्ये २०० कि. ग्रॅम धान्य साठवून ठेवण्याची क्षमता असते.. वारुळाच्या तळाशी काळजी पूर्वक जमा केलेला धान्यावर त्या जगतात. हजारो मुंग्या है वारुळ मिटर आत खोल असुन गारीच्या दगडानी वाळलेला पानानी उब राखल्या जाते. या मध्ये पावसाचे पाणी अजिबात जात नाही मात्र हवा, उजेड, आत पर्यंत पोहचयांचे शौच्छालयाची एका कोपऱ्यात जागा ठरलेली असते. मानवा सारख्या त्या कुठेही घाण करीत नाहीत, त्याच प्रमाणे आतला कचरा बाहेर टाकायचे काम सफाई कामगार मुंग्या करतात.


पावसाचे आगमन मुंग्याना आधिच कळते. मुंगीच्या खोलीची देखभाल शिपाई मुंग्यांकडुन केली जाते. दासदासी त्यामध्ये कुचराई करित नाहीत पूर्व आफ्रीकेच्या काही मुंग्या व्हिस्लींग थॉर्न या जातीच्या मुंग्या बाभळीच्या झाडावर राहतात. चार वेगवेगळ्या जातीच्या मुंग्या या झाडावर राहत असतात या झाडांच्या काही लांधा त्यांनी कुरतडुन तोडल्याचे अभ्यासकाला आढळले. बाभळीच्या लाध्या येजारच्या दुसऱ्या जातीच्या झाडाला जिथे स्पर्श करण्याची शकता होती तेथेचे लांघा कुरतडल्या होत्या आपल्या झाडावर दुसऱ्या झाडांनी आक्रमण करु नये म्हणून झाडावरील मुंग्या स्वतच्या संरक्षणासाठी दुसऱ्या झाडाशी संपर्क येईल अशा प्रकारच्या लाद्याच्या पुल तोंडुन टाकतात आणि आक्रमणाची वाट बंद करुन टाकतात. मुंग्याही शेती करतात. लिजीमधल्या एकाबरोबर अनोख्या मुंग्या आढळून आल्यात या मुम्बा चक्क कॉलीच्या बियांची लागवड करतात. कॉलीच्या बियांची पेरणी केल्यावर रोपटयाची वाढ होईपर्यंत मुंग्या सतत देखभाल करतात. लिहीडस या नावाने जात ओळखली जाते. कॉलीच्या रोपटयामध्ये त्या घर करतात. इथेच राहु लागतात. स्वतसाठी सुगंधी निवासाची सोय करणारी मुंग्यांची हि पहिलीच जात होय. असे वनस्पती शास्त्रज्ञ सुझन रॅनर सांगतात. बराच काळ लोटल्यावर त्यांच घर तयार होत आणि त्या आपला मुक्काम हलवतात. नव्या घरात रहायला जायला त्यांना पाच महिण्याचा कालावधी लागतो.

 

एवडीशी मुंगी पण एवया मोठ्या हत्तीचे मरण मुंगीचावल्याने होते म्हणतात. म्हणुनच हत्ती जागा फुकुन चालतो असे म्हणतात

Post a Comment

0 Comments