जावक.क्र. कक्ष- १२ / जमिन / ३ / चहका/प्र.क्र. १ / भाग-६/३८ 198-94 नागपूर ४४० ००१, दिनांक १६/०४/२०१४
प्रती,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर / पश्चिम मुंबई / नाशिक
मुख्य वनसंरक्षक (प्रा.) (सर्व)
विषय : वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत अंतिमतः नामंजुर झालेल्या दाव्यातील क्षेत्रातील अतिक्रमण हटवून ते ताब्यात घेणेबाबत.
उपरोक्त विषयासंदर्भात याद्वारे असे सुचित करण्यात येते की, वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत ज्या प्रकरणी ग्रामस्तरावर वनहक्क समिती उपविभाग स्तरावर उपविभागीय स्तरीय समिती व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती यांचेकडून दावा अंतिमतः नामंजुर करण्यात आला आहे किंवा यापैकी कोणत्याही समितीकडे अपीलाचा दावा प्रलंबित नाही, अशा दाव्याचे बाबतीत संबंधीत क्षेत्रातील अतिक्रमण हटवून ते वनविभागाने ताब्यात घेणे अभिप्रेत आहे. तरी याप्रकारे कार्यवाही करणेबाबत आपले अधिनस्त सर्व संबंधीतास सुचीत करावे व सदर सुचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल, याची आपले स्तरावरुन नियमित आढावा घेऊन दक्षता घ्यावी.
sd
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण)
महाराष्ट्र राज्य, नागपुर करीता
0 Comments