MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

चराई वनासाठी एक घातक समस्या

 वनातील चराई व्यवस्थापन : अति चराईचे दुष्परिणाम, चराई परवाना नियम आणि चक्राकार चराई पद्धत

वनातील चराई व्यवस्थापन, Grazing Management Maharashtra, चराई परवाना, Rotational Grazing, Forest Grazing Rules, अति चराईचे दुष्परिणाम, वन संरक्षण, महाराष्ट्र वन नियम, Grazing Permit, चराई नियंत्रण.

वन्य प्राण्यांची चराई आणि ब्राऊझिंग वन अधिवासास घातक नसते, कारण त्यांची संख्या सर्वसाधारणपणे वनात उपलब्ध असलेल्या खाद्यांवर नियंत्रित होते. वनांचे चराईपासून खरे नुकसान पाळीव जनावरे आणि. विशेषत: मेंढया व शेळया करतात. अनियंत्रित चराई व ब्राउझिंगचे परिणाम पुढील प्रमाणे आहेत.

१. प्रमाणाबाहेर चराईने वन्यप्राणी व पाळीव जनावरांच्या जमीन तुडविली जाऊन कठीण होते.

२. जमिनीची छिद्रे बुजल्याने ती नैसर्गिक प्रजोत्पादनाकरीता अयोग्य होते. कठीण जमीनीची जल-शोषण क्षमता कमी होते.

३. पावसाचे पाणी जमीनीत न मुरल्याने जमीनीची धूप सुरु होते.

४.अति चराईने झाडी-झुडपे यांचे नुकसान होते.

५. ज्या भागात अनियंत्रित चराई होते त्या भागात खाण्यालायक प्रजातीचे गवताचे प्रमाण कालांतराने कमी होते. कारण अशा प्रजाती बीज धारण करण्याचा टप्पा येण्यापूर्वी खाल्ल्या जातात. असे झाल्याने अशा क्षेत्रात अखाद्य गवतांच्या प्रजातींचे प्रमाण वाढायला लागते. असे झाल्याने उन्हाळी हंगामात अशा अखाद्य प्रजातींचे सुके गवत आगीस कारणीभूत ठरू शकते.

६. अति चराईने गवताचे बीज तयार होणे व त्याचे हवेने प्रसारण होणे कमी होऊन गवताचे उत्पत्तीस अडथळा येतो.

७. वनातील गवत कापून वनाबाहेर नेऊन, पाळीव जनावरांना गोठ्यात खाऊ घालण्याचा पर्याय वापरणे आवश्यक आहे.

चराई नियंत्रण :-

वनातील चराई व्यवस्थापन, Grazing Management Maharashtra, चराई परवाना, Rotational Grazing, Forest Grazing Rules, अति चराईचे दुष्परिणाम, वन संरक्षण, महाराष्ट्र वन नियम, Grazing Permit, चराई नियंत्रण.

चराई क्षमतेनुसार,वनक्षेत्रात चराई घटक तयार केले जातात. चराई परवाना (परमिट) प्रत्येक

वर्षी १ ते ३१ जुलै या काळात दिली जातात. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांचे परवानगीने, २० ऑगस्ट पर्यंत वाढविली जाते. प्रत्येक चराई घटकासाठी पाळीव जनावरांचे घटक, परमिट देतांना ठरविले जातात. याकरिता रेडा आणि म्हैस - २ घटक

बनाना राई सगता

बैल आणि गाय - १ घटक

म्हशीचे वासरु १ घटक

गायीचे वासरु १/२ घटक मानले जातात 

शेळयांना वनात चराईस बंदी आहे.

 मेंढया त्यांच्या करीता चराईसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रात, चरु शकतात. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग एम.एफ.पी / १३६९/६३६९५-झेड, दिनांक २ ऑगस्ट, १९७१ अनुसार चराई परमिट देण्यासाठी प्राथम्य व मापदंड खालील निश्चित करण्यात आले आहेत.

वनातील चराई व्यवस्थापन, Grazing Management Maharashtra, चराई परवाना, Rotational Grazing, Forest Grazing Rules, अति चराईचे दुष्परिणाम, वन संरक्षण, महाराष्ट्र वन नियम, Grazing Permit, चराई नियंत्रण.

१. शेतकरयांना त्यांच्या शेतीकरिता व दुभत्या जनावरांकरीता अधिकत्तम - ४ घटक २. शेतक-यांना त्यांच्या अतिरिक्त शेती व दुभत्या जनावरांकरीता अधिकत्तम - ४ घटक

४. भूमीहिनांच्या दुभत्या जनावरांकरीता अधिकत्तम - ४ व घटक शेतकऱ्यांच्या इतर आवश्यक व अतिरिक्त दुभत्या जनावरांकरीता - ४ घटक

५. भूमीहिनांच्या दुभत्या जनावरांकरीता व शेतकऱ्यांच्या गैर आवश्यक जनावरांकरीता ४

६.भूमीहिनांच्या भाकड जनावरां करीता क्षेत्रात नमूद नसलेल्या गावातील जनावरांकरीता

७. दूध देणाऱ्या जनावरांना दुभती जनावरे म्हणून वर्गीकृत केले आहे. शेती कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व जनावरांना शेतीची जनावरे म्हणून वर्गीकृत केले आहे. २० एकर (८ हेक्टर) शेतीसाठी एकु नांगर घटक ठरविला आहे. एका नांगर घटकासाठी ४ घटक चराई परमिट देता येतात. प्रत्येक चराई घटकासाठी रु.एक वार्षिक चराई शुल्क आकारण्यात येते.

चक्राकार पध्दतीने चराई (Rotational Grazing)

कमी झाडी-झुडपे व वृक्ष असलेल्या गवताळ विस्तृत वन जमिनीस कुरण किंवा रमणा म्हणतात. अशा विस्तृत वन जमिनी 'क' वर्ग राखीव वनांत, यवतमाळ, वर्धा, धुळे, अकोला, बुलढाणा, जळगाव या जिल्हयांत प्रामुख्याने आढळतात. या गवताळ जमिनी आळी-पाळीचे चराई करीता योग्य असतात. सर्वसाधारणतः असे सलग कुरण क्षेत्र चार भागात विभागून, दरवर्षी एका-आड एक दोन भाग चराईसाठी खुले ठेवून, दोन भाग चराईस बंद ठेवतात. या आळी-पाळीच्या चराई व्यवस्थापनाने गवताची नैसर्गिक प्रजोत्पत्ती, गवताचे बी पेरुन त्याचा वापर इतर वनीकरण क्षेत्रात करणे व काही काळ चराई क्षेत्रास विश्रांती देणे शक्य होते.

मेंढयांची वनात चराई

वनातील चराई व्यवस्थापन, Grazing Management Maharashtra, चराई परवाना, Rotational Grazing, Forest Grazing Rules, अति चराईचे दुष्परिणाम, वन संरक्षण, महाराष्ट्र वन नियम, Grazing Permit, चराई नियंत्रण.

चराई परवानगी देण्याचा कालावधी - जिथे रोपांची उंची सुरक्षित मर्यादे इतकी झाली नाही, तिथे मेंढयांची चराई काही प्रमाणात रोपांना घातक ठरु शकते, परंतु मेंढयांची चराई पुर्णत: बंद करणे मेंढी पालन उदयोगास विनाशकारक ठरु शकते. ज्या तालुक्यात, मेंढयांची पैदास केली जाते आणि त्यांना चराईस वनांत सोडले जाते, तिथे आळी-पाळीने चराई केली पाहीजे. चराई करीता परवाना घेऊन १५ सप्टेंबर ते १५ मे या कालावधीत चराईस बंद नसलेल्या वनक्षेत्रात, चरण्यास परवानगी दयावी

चराई परवाने तपासणे

वन चराईचे कालावधीत, वनपाल व वनरक्षक यांनी चराई परवाने व जनावरे वनांत तपासून नियंत्रण ठेवावे. तपासातील पाहणीत जास्तीची जनावरे आढळल्यास त्यांना कोंडवाडयात टाकावे.


Post a Comment

0 Comments