MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

पाणवठ्यावर युरिया द्वारे वन्यप्राण्यांना विषबाधा

 वन्यप्राणी व युरिया विषबाधा



शेती साठी युरियाचा वापर प्रामुख्याने करतात प्रत्येक शेतकऱ्या कडे युरीया असते व कृषी केंद्रात सुद्धा मिळते. हे सर्वाना माहितच आहे.
उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असतोच व जंगले सुद्धा यास अपवाद नाही. वनविभागाकडून वन्यप्राण्यानकरिता पाण्याची सोय युध्द पातळीवर करण्यात येते. कृत्रिम पाणवठे निर्माण केली जातात व यात नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. आजकाल सोलर पम्पाद्वारे सुद्धा बोअरवेल मधून पाणी पुरवठा करण्यात येतो. २४ तास अश्या पाणवठ्यात वन्यप्राण्याना पाण्याची सोय उपलब्ध असते.
परंतु अश्या पाणवठ्यावर काही वन्यजीव शिकारी भरपूर प्रमाणात युरिया टाकतात. युरिया पाण्यात सहज विरघळते. व पाणी एकदम थंड सुद्धा होते. परंतु भरपूर प्रमाणात युरिया टाकल्यावर ते विरघळत नाही. अश्या द्रावनास संपृक्त द्रावण [ Saturated ] असे म्हणतात.
पाण्यात युरिया टाकले आहे का कसे ओळखावे
·        पाण्यात भरपूर मात्रेत युरिया टाकल्यास संपृक्त द्रावन तयार झाल्याने जास्तीचे युरिया पाण्याच्या तळाशी जमा होते व  टाक्याच्या तळाशी पसरते. व पांढुरक्या सायी सारखी जमा होते.
·        पाण्याची साठ्याजवळ अमोनिया वायूचा वास येतो.
·        पाण्यातून बुडबुडे निघतात.



·        पाण्यात युरिया टाकताना बरीच युरिया टाक्याच्या बाहेरसुद्धा पांढऱ्या दाण्यासारखी आढळते.
असा प्रकार जर पाणवठ्यावर दिसला तर काय करावे
·        pH paper चा वापर करावा. पाण्याचा pH ७ आहे व युरीयाचा ७.२ आहे. प्रथम pH paper पाण्यात बुडवावा व pH पाहावा. pH जर ७ च्या वर असेल तर पाण्यात अल्कली मिसळले आहे असे समजावे. pH जर ४.५ च्या खाली असेल तर आम्ल मिसळले आहे



असे समजावे. बहुधा पाण्याचा pH हा ७ च्या वर असतो कारण आपण जे पाणी टाक्यात टाकतो त्यात बरेच क्षार असतात.
·        एका काचेच्या नळीत युरिया मिश्रित पाणी घ्यावे व त्यास उकळावे. अमोनिया वायुचा वास येतो.
·        पाण्यात litmus पेपट बुडवावा. लाल litmus paper निळा झाला तर पाण्यात अल्कली मिसळले आहे असे समजावे.
·        ५ ML युरिया मिश्रित पाण्यात ५% coppersulphate १ ML व ५% Caustic soda १ ML टाकावा. पाण्याचा रंग लालसर होतो.
 असे पाणी जर वन्यप्राणी प्यायले तर वन्यप्राण्यांचा मृत्यू अमोनिया
वायूच्या विषबाधेमुळे होतो.
असे युरिया मिश्रीत पाणी प्याल्यानंतर अंदाजे ३ तासानंतर जनावर दगावतात.
वन्यप्राण्यांवर उपचार करता येत नाही कारण जनावराच्या पोटात tube टाकून उपचार करावा लागतो. युरिया बाधित प्राण्याच्या पोटात अंदाजे १ ग्यालन ५% Aceticacid किंवा vinegar पाजावे लागते.
वरील धोका टाळण्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
·        नियमित कृत्रिम पाणवठे पाणी  तपासणी pH paper द्वारे करावी
·        अमोनिया वायूचा वास येतो का पाहणे.
·        पाण्याच्या तळाशी पांढरी साय आहे का पाहणे.
·        वायूचे बुडबुडे येतात का पाहणे.
·        tanker मधील पाण्याचा पहिले pH पाहणे.
·        शुध्द पाण्याचा pH ७ असतो.. त्यामुळे tanker मधील पाण्याचा pH ७ च्या वर असू शकतो कारण हे पाणी शुध्द नसते.
·        पानवाठ्याच्या आजूबाजूला युरिया दाणेदार व पांढऱ्या रंगात पसरलेला दिसतो का.
·        दिवसातून ४ वेळा पाण्याची तापसी करावी व pH चि नोंद लिहावी.
·        सोबत pH पेपर ठेवावा.
·        सोबत टेस्ट tube, lighter ठेवावा. पाणी गरम करावयास कामी येईल.
या सर्व बाबींवर नियमित कार्यवाही करावी व बहुमूल्य वन्यप्राण्याचे प्राण वाचवावे.
टाक्यात युरिया मिश्रित पाणी आढळ्यास त्या टाक्यावर वन्यप्राण्याना पाणी पिण्यास  प्रतिबंध करावा व टाक्यात माती किंवा रेती टाकावी व पूर्ण टाके कोरडे करावे. युरिया मिश्रित पाणी व माती पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावावी [... खड्ड्यात पुरून]
टाके चांगल्या पाण्याने धुवून पुन्हा पाणी भरावे.

Post a Comment

0 Comments