MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनातील गस्तीबाबत स्थाई आदेश क्रं 01/2016

वनांच्या गस्तीबाबत स्थाई आदेश क्र. 1/ 2016 /  संरक्षण

 प्रस्तावना

वने ही नैसर्गिक संपत्ती असुन त्यांचे पुनरुज्जीवन शक्य असल्यामुळे त्यांचे संरक्षण, संगोपन व व्यवस्थापन करणे वनविभागाचे कर्तव्य आहे. वन प्रामुख्याने जमीन, वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीवजंतु यानी बनलेली असतात. वनाचे घटक हैं एकमेकास पुरक असल्यामुळे ते सजीव सृष्टीचा समतोल राखण्याचे कार्य करतात. यापैकी कोणत्याही एका घटकाचा नाश झाल्यास हा समतोल बिघडतो आणि पर्यावरणा संबंधीच्या समस्या उभ्या राहतात.

वनांचा -हास होण्यामागे अवैध वृक्षतोड, अवैध चराई, वनवणवेअतिक्रमण इत्यादी प्रमुख बाबी भारणीभूत आहेत. तो यार गुन्हे हे खास हंगामामध्ये कमी किंवा जास्त होत असल्याचे आढळुन येत नाही. जवळपास सर्व वर्षभर बनगुन्हे कमी जास्त प्रमाणात होतच असतात. त्यामुळे विशेष कृती आराखडा राबवून वनगुन्हेवर नियंत्रण घालणे ही आपली जबाबदारी झालेली आहे. त्यातच आपणास लाभलेली वनसंपत्ती ही खुल्या अवस्थेत आहे. त्यामध्ये सातत्याने होणा-या चोरटया घटना मारहाणी व हल्ले यामुळे कर्मचा-यांचे खचलेले मनोबल वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. कर्मचा-यांच्या संख्येच्या तुलनेत तस्कर, शिकारी टोळया व असामाजिक तत्वे संघटीत असुन त्यांची संख्या सुध्दा जास्त आहे. गुन्हेकामी पुरुषांसोबत त्यांच्या स्त्रियासुध्दा सामील असतात. अशा प्रकरणी. कार्यवाही करणे अडचणीचे होते. वनांचे संरक्षण करण्याकरीता लगतच्या गावांमध्ये तसेच इतरत्रही जनजागृती करणे व त्यात ग्रामीणांचा तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचा सहभाग असणे काळाची गरज आहे..
महाराष्ट्राचे एकुण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१३ चौ.कि.मी. असून जवळपास ६१.५७३ चौ.कि.मी. इतके आहे. त्यांची भौगोलिक क्षेशी टक्केवारी २० टक्के आहे. राष्ट्रीय वननिती अन्वये भौगोलिक क्षेत्रात ३३ टक्के वनाच्छादन असणे गरजेचे असल्याने वनगुन्हे नियंत्रित करणे हे महत्वाचे कार्य वन विभागाकडे आहे. त्यामुळे बनगुन्हेंना आळा घालण्याकरीता जास्तीत जास्त प्रभावी वनगस्ती करणे आवश्यकः आहे. त्याकरीता सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्याची गरज आहे.

१.०  वनगुन्हेचे सर्वसाधारण स्वरुप,

प्रामुख्याने वनगुन्हयांमध्ये अवैध वृक्षतोड, अवैध वणवा, अतिक्रमण व अवैध शिकार या बाबींचा समावेश होतो. गावातील घरांचे बांधणीकरीता लाकूडफाटा व जळतण तसेच शेतीच्या अवजारांकरीता वृक्षतोड केली जाते. बनाचे शेजारी असणारे आदिवासी क इतर जमातीचे लोक वनातील जमिनीवर अतिक्रमण करतात व तेथे आपल्या स्वार्थाकरीता पिके घेवून उदरनिर्वाह करतात. व्यापारिक तत्वावर जंगलात वृक्षतोड करून वनतस्कर त्यांची इतर राज्यात तस्करी करतात. वाघ व बिबट सारख्या प्राण्यांची शिकार त्यांचेपासुन उपलब्ध होणा-या मौल्यवान कातडी, नखे, दात व हाडांकरीता केली जाते. तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांची शिकार त्यांचेपासून मिळणा-या मांसाकरीता केली जाते. गावाकडील लोक शेतीस जोडधंदा म्हणुन शेळया मेंढया पाळतात व त्यांना चराईकरीता जंगलात सोडण्यात येते. काठेवाडी लोक त्यांच्या गाई व मेंढया संघटीतरित्या वनात सोडून अतोनात नुकसान करतात. या सर्व बाबी लक्षात घेता, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी वनसंरक्षणार्थ रात्रंदिवस गस्त करीत असतात..

२.० गस्तीचे उद्देश.

४. अवैध शिकार
६. अवैध वाहतुक, इत्यादी बाबींवर नियंत्रण घालणे.
७. भूतकाळातील वन गुन्हे बाबत कार्यपध्दतीची माहिती गोळा करणे.

३.० गस्तीपूर्व खबरदारी.

गस्ती वाहनाची देखभाल व वाहन सुस्थितीत असण्याची जबाबदारी संबंधीत वनपरिक्षेत्र अधिकारी यांची असेल तसेच गस्तीवर जाण्यापूर्वी रायफल व पिस्तुल सुव्यवस्थित आहे किंवा कसे याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी. गस्तीवर जाण्यापूर्वी गस्तीपथक संपूर्ण शासकीय गणवेशात राहणे अनिवार्य आहे. गस्तीपूर्वी शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा असल्यास ती पोलीस स्टेशनला कळवून वेळीच काढून घ्यावी.

४.० गस्तीची तयारी.

१. दिवसाचे उजेडात गस्त करावयाची असल्यास, गस्ती पथकात कमीत- कमी ३-४ अधिकारी/कर्मचारी असावेत.
२) रात्री गस्त करावयाची असल्यास, गस्ती पथकात कमीत कमी ५-६ अधिकारी/कर्मचारी असावेत.
३. रात्रीचेवेळी गस्ती दरम्यान सोबत एक रायफल तसेच एक पिस्तोल प्रशिक्षित कर्मचा-यांकडे असावे. सदर गस्तीचे नेतृत्व वनपाल किंवा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी करतील हे सुनिश्चित कराने
४) रात्र गस्त जाण्यापूर्वी गस्ती पथकाने वनपाल गस्तीप्रमुख असल्यास, संबंधीत वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी घ्यावी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गस्ती पथकास वाहन व शस्त्रे उपलब्ध करुन द्यावी..
५. गस्तीप्रमुखाने आपले वरिष्ठांना ते कोणत्या भागात गस्त करणार आहेत, गस्त किती वाजता सुरु होवून अंदाजे किती वाजता संपेल तसेच गस्तीस उपलब्ध कर्मचा-यांबाबत नावासकट माहिती द्यावी.
६. गस्तीपथकात शक्यतोवर २ महिला कर्मचारी असावेत.
७. गस्तीपथक यांचेसोबत प्रथमोचाराची पेटी असणे अनिवार्य राहील.
८. सराईत तस्करांचे टोळीविरुद्ध धाड मारण्याची कार्यवाही करावयाची असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी यांना कळवून त्यांची मदत घ्यावी.
९. अचानक उदभवणा-या कठीण प्रसंगी पथक प्रमुखाने त्वरीत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती द्यावी व पथकातील कर्मचा-यांची जिवीत हानी होणार नाही याकरीता तातडीने निर्णय घ्यावा.
१०. पथकातील कर्मचा-यांनी शस्त्रे वापरण्याबद्दल आचारसंहिता व नियमावली बाबतचे शासन निर्णय दिनांक ०८ मार्च, २००२ चे पालन करावे (प्रतं संलग्न) (परिशिष्ट- १)


५.० गस्ती वेळेस घेण्याची खबरदारी

१. गस्ती करीत असतांना त्यांनी अवैध वृक्षतोड, वाहतुक शिकार, अतिक्रमणवणवणवा इत्यादी बाबीवर नियंत्रण करावे. वनगुन्हे आढळल्यास किंवा आरोपी. जप्ती माल, वाहन, गुरेढोरे इत्यादी मिळाल्यास पंचनामा नोंदवून प्राथमिक गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही करावी 
२. कोणतेही वाहन तपासणी करीता थांबविल्यास त्याचे मागील भाग तपासणी पुर्वी वाहनाचे इंजिन बंद करून घ्यावे व ट्रक, बस सारखे उंच वाहन असल्यास त्याची चाबी बाहेर काढून घ्यावी.
३. वाहन तपासणी करीता थांबविल्यावर कमीत कमी दोन कर्मचा-यांनी शस्त्रासह वाहनचालक व त्यांचे सोबत असणारे सहकारीवर लक्ष ठेवावे.
४. बॅरीअर समोर वनकर्मचा-यांनी सावधानीपुर्वक उभे राहावे व वाहन थांबत नसल्यास योग्य वेळेत बाजुला व्हावे.
५. कधीही दोन किंवा तीनचे संख्यामध्ये गस्ती करणारे वनकर्मचा-यांनी मोठया ग्रुपमध्ये असणारे गुन्हेगार / तस्कर यांना अटक करू नये. शक्यतो रात्रीचा वेळ त्यांची ओळख पटविण्यापर्यंतच गोपनीयरीत्या कार्यवाही करावी.
६. गस्ती संपल्यानंतर गस्तीचा संपूर्ण अहवालाची नोंद वनपरिक्षेत्र कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या गस्ती रजिस्टरमध्ये करावी.


६.० गुप्त माहितीकरीता यांची नियुक्ती

 वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपले वनक्षेत्र स्तरावर योग्य असे खबरे निवडून त्यांची नियुक्ती करावी. तसेच वेळोवेळी त्यांचे संपर्कात राहुन त्यांना दिलेल्या निर्देशाबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. खब-याचे नियुक्तीकरीता शासनाने गुप्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे. (शासन निर्णय दिनांक ५/२/१३ अन्वये)
१. खब-यांकडे सदर कामाचा शक्यतो पुर्वानुभव असावा.
२. खब-यांकडून माहिती प्राप्त करतांना इतर कुणीही उपस्थित राहु नये, गुप्तपणे माहिती गोळा करणे उचित राहील.
३. खबरे विश्वासू असावेत व त्यांचे सुरक्षिततेबाबत संबंधीत अधिकारी यांनी संपुर्ण दक्षता घ्यावी.


७.० गस्तीप्रमुख यांची कर्तव्ये

वनातील अवैध वृक्षतोड, वाहतुक, अवैध शिकार, अतिक्रमण, इत्यादीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरीता परिमंडळ, वनपरिक्षेत्र तसेच विभागीय स्तरावर गस्ती पथकांचे गठन करण्यात आलेले असून त्यात वनमजुर, रॉजदारी मजुर, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांचे सोईनुसार रात्री व दिवसा गस्त घालत असतात. वनसंरक्षण करीता गस्त घालीत असतांना गुन्हेगारांकडून/ तस्करांकडून / शिका-यांकडून गंभीर किंवा किरकोळ हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर हल्यामध्ये किरकोळ स्वरूपात वनकर्मचारी / अधिकारी जखमी झाल्यास वनकर्मचा-यांवर प्राथमिक स्वरूपात उपचार करून घेण्याची जबाबदारी संबंधित वनपरिक्षेत्र अधिका-यांची राहील. गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या वन कर्मचा-यांना तात्काळ रूग्णालयामध्ये भरती करून उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिका-यांचे देखरेखेखाली योग्य ते उपचार झाले पाहिजे. सदर उपचारावर झालेल्या संपुर्ण खर्चाची प्रतिपुर्ती संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर मिळावी याची जबाबदारी संबंधीत उपवनसंरक्षक यांची असेल.
वन अधिकारी / कर्मचा-यांवर किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे हल्ले झाल्यास त्या संबंधी तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याची जबाबदारी वनपरीक्षेत्र अधिकारी यांची असेल, तसेच त्यांनी सदरील बाब तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवावी,

८.० क्षेत्रीय वनअधिकारी/कर्मचारी यांचे करीता सर्वसाधारण सूचना

क्षेत्रीय कर्मचारी हे अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये आपल्या जबाबदा-या पार पाडत असतात. त्यांचे गस्तीचे मुलभूत उद्दीष्टे परिणामकारकरीत्या साधण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांनी खालील प्रमाणे सर्वसाधारण सुचनांची अंमलबजावणी करावी

८.१ शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण

आतापर्यंत शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या एकूण अधिकारी / कर्मचा-यांची संख्या ३८९४ आहे. प्रादेशिक व वन्यजीव वनवृत्त स्तरावर महाराष्ट्र पोलिस अॅकेडमी नाशिक यांच्याशी समन्वय साधुन प्रत्येक सहामाहित एक या प्रमाणे दरवर्षी दोन वेळा वनअधिकारी /कर्मचारी यांना शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. सर्व वनवृत्त यांनी प्रत्येक वर्षी त्यांचे वनवृत्तातील दरवर्षी किमान १० वन अधिकारी / कर्मचारी यांना सदर प्रशिक्षणास पाठवावे,
१. शस्त्र हाताळणे प्रशिक्षण घेण्या. यांची वयोमर्यादा ५० वर्षाच्या आत असावी.
२. सदर वनअधिकारी/कर्मचारी महाराष्ट्र पोलीस अंकेडमी, नाशिक येथील पूर्व प्रशिक्षणार्थी नसावे.
३. शस्त्र प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा वनवृत्त स्तरावर अभिलेख (Record) ठेवण्यात यावा.

८.२ सराव

शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांना किमान २ वर्षातुन एकदा गोळीबाराचे सरावाकरीता पाठविण्यात यावे.

८.३ शस्त्रांची देखभाल / रखरखाव (Maintenance)

१. उपवनसंरक्षक / विभागीय वनअधिकारी यांनी विभागाचे माजी सैनिक संवर्गातून नियुक्त वनरक्षक किंवा स्थानिक पोलिस विभागाशी संपर्क साधुन त्यांचे अधिनस्त असलेल्या वनपरिक्षेत्रातुन हत्यारे व दारूगोळा मागवुन सदर शस्त्रे पोलिस विभागाचा प्रशिक्षीत कर्मचा-यांकडून किमान वर्षातुन एकदा सर्व्हिसिंग / तपासणी करून घ्यावी व त्याबाबतचा अभिलेख ठेवावा.
२. उपवनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचा-यांकडून दोन वर्षातून एकदा प्रत्यक्ष दारूगोळा वापरून गोळीबाराचा सराव करवून घ्यावा.

८.४ कायद्याचे संरक्षण :-

शासनाने वन संरक्षणार्थ वनकर्मचारी/अधिकारी यांना शस्त्रपुरवठा केलेला आहे. शासन अधिसूचना दिनांक १९/०९/२००६ अन्वये वनरक्षक वनपाल, वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षक, विभागीय वन अधीकारी व उपवनसंरक्षक यांना वनसंरक्षणाशी निगडीत जन सुव्यवस्था (Public order) राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 197 (2) व 197 (3) खाली सशस्त्र बलाचे सदस्यांना लागू असलेल्या तरतुदी लागू करुन वैधानिक संरक्षण प्रदान केले आहे, याची जाणीव सर्व संबंधीतांना करुन देण्यात यावी. शस्त्रांचा वापर हा केवळ वन संरक्षणार्थ किंवा आत्मसंरक्षणार्थ स्थितीतच असावा. गुन्हेगारांना ठार मारणे हा उददेश कदापी नसावा.

८.५ PDA / Smart phone:-

वन विभागात संगणकीकरण करण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या ICT प्रकल्पाअंतर्गत सर्व वनरक्षक व वनपाल कर्मचा-यांकरीता एकूण 7000 PDA / Smart phone वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आतापर्यंत 6742 PDA / Smart phone उपकरण क्षेत्रीय कर्मचा-यांना वाटप करण्यात आलेले आहेत. सर्व वरिष्ठ अधिका-यांनी PDA चा सुयोग्य वापर होत असण्याबाबतची खात्री करावी.


८.६ गुप्त सेवा निधी:-

शासन निर्णय दि.०५/०२/२०१३ अन्वये पोलीस विभागाच्या धर्तीवर खब- यांचे जाळे विकसीत करण्यासाठी वन विभागात गुप्त सेवानिधी स्थापन करण्यात आलेला आहे. सन 2012-13 मध्ये रु. 1.98 लक्ष खर्च झाला असून सन 2013-14 मध्ये रु. 6.56 लक्ष इतका खर्च झाला आहे. सन 2014-15 करीता रु. 17.48 लक्ष इतका खर्च झाला आहे. सदर निधीचा उपयोग करुन खब-यांचे सशक्त जाळे उभारले जाईल याची दक्षता संबंधीत मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घ्यावी.


८.७ नियंत्रण कक्ष

वनात होत असलेली अवैध वृक्षतोड व इतर अवैध घटनेची माहिती लोकांकडून प्राप्त करुन घेण्यासाठी सर्व वनविभाग प्रमुखांनी त्यांचे स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करावी.
आपल्या वनांचे संरक्षण व जपणूक हे इच्छित उद्दीष्ट साध्य करण्याकरीता सर्व संबंधीतांनी या राई आदेशातील मार्गदर्शक तत्वे व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करावे.

(सर्जन भगत)
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) 
महाराष्ट्र राज्य, नागपूर

वन विभाग स्थाई आदेश pdf
वन विभाग शासन निर्णय pdf
mahaforest.org 
mahaforest.gov.in
mahaforest.nic.in
mahaforest
www.mahaforest.gov.in
Standing Order No 01 / 2016 | Mahaforest Standing Order No 01 /2016| वनविभाग स्थाई आदेश क्रं 01| maharastra Standing Order No 01 |Standing Order 01/2016 | Mahaforest Standing Order 01| वनविभाग स्थाई आदेश 01| maharastra Standing Order 01 | Wildlife Protection Standing Order no 01 | वन्यजीव संरक्षण स्थाई आदेश क्रं 01/2016 | संरक्षित क्षेत्र स्थाई आदेश क्रं 01 | जंगल गस्त स्थाई आदेश | 

Post a Comment

0 Comments