भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 37 व 38 वनाची मालकी व वन संरक्षण
भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 36
भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 37
37. विशिष्ट बाबतीत वनाची मालकी काढून घेणे.
(1) या प्रकरणात येणा-या कोणत्याही बाबतीत राज्य शासनास असे वाटत असेल की, असे वन, वन अधिका-यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याऐवजी ते वन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करण्यात यावे तर, अशा बाबतीत राज्य शासन त्यास भूमि संपादन अधिनियम, 1894 यात तरतूद केलेल्या रीतीने पुढे काम सुरु करेल.
भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 38
38. मालकाच्या विनंती वरून वनाचे संरक्षण करणे.
(1) कोणत्याही जमिनीच्या मालकास किंवा तिचे एकाहून अधिक मालक असतील तर, ज्यांचे अशा जमिनीत कमीत कमी दोन तृतियांशाइतके एकूण हिस्से असतील, अशा या जमिनीच्या मालकांना, त्या जमिनीवर वने तयार करण्याच्या किंवा तीजवरील वनाचे जतन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिका-याकडे एक लेखी विनंती अर्ज सादील करता येईल व त्याद्वारे;-
(ए) त्यांच्या वतीने अशा जमिनीची व्यवस्था राखीव किंवा संरक्षित वने म्हणून परस्पर ठरविण्यात येतील, अशा शर्तीवर वन अधिका-यांनी करावी; किंवा
(बी) या अधिनियमाच्या तरतुदीपैकी सर्व किंवा कोणत्याही तरतुदी अशा जमिनीस लागू करण्यात यावे; अशी आपली इच्छा असल्याबद्दल जिल्हाधिका-यास कळविता येईल.
(2) अशा प्रत्येक बाबतीत राज्य शासनास, त्यास त्या जमिनीच्या संबंधातील परिस्थिती अनुसार या अधिनियमाच्या ज्या तरतुदी अशा जमिनीस लागू करणे त्यास योग्य वाटेल व जे लागू करण्याची अर्जदाराची इच्छा असेल त्या तरतुदी त्यास राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे त्या जमिनीस लागू करता येतील.
भारतीय वन अधिनियम 1927 कलम 39
0 Comments