MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन नियमावली, 2014 : नियम 9 – राखीव व संरक्षित वनांतील प्रतिबंधित कृत्ये

 महाराष्ट्र वन नियमावली, 2014 : राखीव व संरक्षित वनांमध्ये शिकार व गोळीबारास प्रतिबंध

महाराष्ट्र वन नियमावली, 2014 : नियम 9 – राखीव व संरक्षित वनांतील प्रतिबंधित कृत्ये

भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 26(1)(आय) अन्वये राखीव वनामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणे, त्यांना पकडणे, जखमी करणे किंवा ठार मारणे तसेच शिकार करण्यासाठी विविध साधने किंवा उपायांचा वापर करणे यांस प्रतिबंध करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच, भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 32(जे) अन्वये संरक्षित वनांमध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी विविध कृत्यांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य शासनास नियम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 76(डी) अन्वये या अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने नियम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या वैधानिक तरतुदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र वन नियमावली, 2014 च्या प्रकरण–III मध्ये “राखीव वनात आणि संरक्षित वनात शिकार करणे आणि बंदुकीने गोळी घालणे इत्यादी” या विषयाखाली नियम 9 करण्यात आला आहे.

वरील वैधानिक तरतुदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील प्रकरण–III अंतर्गत नियम 9 मध्ये राखीव व संरक्षित वनांमध्ये शिकार करणे, बंदुकीने गोळी घालणे तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणाशी संबंधित प्रतिबंधित कृत्यांबाबत करण्यात आलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 3 ते 8

प्रकरण – III

राखीव वनात आणि संरक्षित वनात शिकार करणे आणि बंदुकीने गोळी घालणे इत्यादी

[ भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)(आय), 32(जे), 76(डी)]

नियम 9. राखीव वन आणि संरक्षित वन यांतील प्रतिबंधित कृत्ये.

(1) सर्व राखीव आणि संरक्षित वनात खालील कृत्ये प्रतिबंधित राहतील :—

(अ) जमीन, नद्या, पाणवठे व इतर जलस्त्रोत यात विष प्रयोग किंवा दुषितीकरण करणे, अभिस्फोटकाद्वारे किंवा स्फोटकाद्वारे त्या क्षेत्रात किंवा इतरत्र स्फोट घडविणे आणि मासेमारीकरिता किंवा मासे पकडण्याकरिता टोपल्यांचे अथवा इतर सापळे लावणे;

(ब) वन्य प्राण्यांच्या लपणस्थळांचा शोध घेण्यासाठी मागोवा करणे;

(क) जाळी, फासे, सापळे आणि ताण-बंदुका किंवा इतर साधने वापरणे;

(ड) कोणत्याही कारणास्तव विद्युतप्रवाह वाहिकेस तारेने जोडणे;

(इ) वन्य प्राण्यांना ठार मारणे किंवा जखमी करणे किंवा हाक करणे, वन्य प्राण्याची शिकार अथवा खाद्य बांधून ठेवणे, विष प्रयोग करणे, पकडणे अथवा अशा तऱ्हेचे कोणतेही प्रयत्न करणे;

(फ) वन्य प्राण्यांची अंडी, घरटी अथवा पोळी यांना धक्का लावणे किंवा नाश करणे;

(ग) मेलेले पाळीव प्राणी, गुरेढोरे किंवा वन्य प्राणी यांचे शव कोणत्याही पद्धतीने हलविणे, त्यावर विषबाधा करणे किंवा हस्तक्षेप करणे;

(ह) शासकीय कर्तव्ये बजाविण्याव्यतिरिक्त इतर वेळी कीटकनाशके, किटकनाशके, रासायनिक खते अथवा कुठलीही शस्त्रे बाळगणे;

(आय) कुत्र्यासह अप्रशिक्षित करणे किंवा वन्य प्राण्यास भीती दाखविण्यास, पाडण्यास, जखमी करण्यास किंवा ठार मारण्यास सक्षम असलेल्या कुत्र्यास किंवा इतर कोणत्याही पाळीव अथवा प्रशिक्षित प्राण्यास अप्रवेश करण्यास लावणे;

(2) या नियमातील कोणतेही कृत्य, संबंधित उप वनसंरक्षक यांच्या लेखी परवानगीने केले असल्यास, ते प्रतिबंधित राहणार नाही.

(3) भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम  66 मधील निहित शक्तींचा वापर करताना, जर वन अधिकाऱ्यास उप-नियम (1) (आय) मधील उल्लेखित कुत्रा किंवा इतर पाळीव किंवा प्रशिक्षित प्राण्यास विनाविलंब वनांच्या हद्दीबाहेर हाकलणे किंवा पकडणे शक्य नसेल, तर त्यावेळी उपलब्ध सर्व साधनांद्वारे असे अप्रवेश करणाऱ्या प्राण्यास ठार मारणे, बंदिस्त करून वनाबाहेर काढणे, वन अधिकाऱ्यासाठी कायदेशीर राहील.

अशा वेळी अप्रवेश केलेल्या प्राण्याकडून कोणत्याही वन्य प्राण्याला वनक्षेत्रात अथवा वनक्षेत्राबाहेर भिवविणे, पाठलाग करणे, जखमी करणे किंवा ठार मारलेले असणे आवश्यक राहणार नाही.

पर्यायी पोस्ट 

1. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 

2. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 31

3. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 32

4. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 53

5. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 79 

6.महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 83


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 9 कशाशी संबंधित आहे?

महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 9 हा राखीव वन आणि संरक्षित वनांतील प्रतिबंधित कृत्यांशी संबंधित आहे. या नियमात शिकार, वन्य प्राण्यांना पकडणे किंवा जखमी करणे, सापळे वापरणे आणि इतर संबंधित कृत्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

2. राखीव व संरक्षित वनांमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करता येते का?

नाही. नियम 9 अंतर्गत राखीव व संरक्षित वनांमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणे, त्यांना पकडणे, जखमी करणे किंवा ठार मारणे यांसारखी कृत्ये प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

3. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 9 कोणत्या कायद्याच्या तरतुदींशी संबंधित आहे?

नियम 9 हा भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 26(1)(आय), 32(जे) आणि 76(डी) यांच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे. नियम 9(3) मध्ये भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 66 अंतर्गत शक्तींच्या वापराबाबतही तरतूद आहे.

Post a Comment

0 Comments