MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन्यप्राणी हल्ला, पिक नुकसान व पशुधन भरपाईसाठी नवीन मोबाईल अँप

महा वन्यजीव नुकसान भरपाई मोबाईल अॅप : नागरिकांसाठी मोठा दिलासा

मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने “महा वन्यजीव नुकसान भरपाई” (Maha Vanya-Jeev Bharapai) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे.
या अॅपच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या पिक नुकसान, पशुधन हानी तसेच व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाल्यास नागरिक थेट मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामुळे वन कार्यालय, सेतू केंद्र किंवा इंटरनेट कॅफेमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.
अॅपचे उद्घाटन दिनांक 21.03.2025 रोजी करण्यात आले असून ते Google Play Store वर “Maha Vanya-Jeev Bharapai” या नावाने उपलब्ध आहे.

Maha Vanya-Jeev Bharapai Mobile App. ची वैशिष्ठे

१. उक्त मोबाईल अॅपमुळे अर्जदारांना सेतू केंद्र किंवा इंटरनेट कॅफे किंवा वन कार्यालयात न जाता घर किंवा घटनास्थळ किंवा इतर कोणत्याही स्थळावरून कोणत्याही वेळी मोबाईलद्वारे आवश्यक माहीती भरुन अर्ज सादर करणे शक्य होणार आहे.
२.. अर्ज सादर केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरील अर्जाची स्थितीबाबत जसे अर्ज स्वीकारणे, मान्यता प्रदान करणे तसेच भरपाई रक्कम खात्यात जमा होणे इत्यादी टप्प्याबाबतची माहीती सुध्दा वेळोवेळी अर्जदारांना मोबाईलवर मिळणार आहे.
३. वन्यजीवांमुळे नुकसान भरपाई प्रकरणांत उक्त मोबाईल अॅपमुळे अधिक पारदर्शकता, गतीमानता व उत्तर दायित्व येणार आहे.

ICT प्रकल्पांतर्गत विकसित आणि कार्यान्वित वन्यजीव संबंधित वानिकी प्रणाली "महा वन्यजीव नुकसान भरपाई मोबाईल अँपचा पुरेपूर वापर आणि प्रचार प्रसिद्धी बाबत. परिपत्रक दिनांक 12.05.2026



महा वन्यजीव नुकसान भरपाई मोबाईल अॅप संदर्भातील महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत परिपत्रक

महाराष्ट्र वन विभागाचे महा वन्यजीव नुकसान भरपाई अॅप परिपत्रक | पिक नुकसान, पशुधन व वन्यप्राणी हल्ला भरपाई माहिती



 Maha Vanya Jeev Bharapai App Maharashtra | Crop Damage & Wildlife Compensation

Maha Vanya Jeev Bharapai App Download | वन्यजीव नुकसान भरपाईची सोपी प्रक्रिया

Post a Comment

0 Comments