MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

Application requesting for the issue of instructions to all officers of the Forest Department working under your kind control with regard to provisions of the Maharashtra Felling of Trees (Regulation) Act, 1964.

Application requesting for the issue of instructions to all officers of the Forest Department working under your kind control with regard to provisions of the Maharashtra Felling of Trees (Regulation) Act, 1964. Regards PCCF Latter Date. 23.07.2025


विषय:-Application requesting for the issue of instructions to all officers of the Forest Department working under your kind control with regard to provisions of the Maharashtra Felling of Trees (Regulation) Act, 1964. Regards PCCF Latter Date. 23.07.2025



वनविभागाच्या क्षेत्रिय कर्मचारी / अधिकारी यांचेमध्ये महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 1964 नुसार कोणत्या वृक्ष प्रजातींबाबत वृक्ष अधिकारी यांना अधिकार आहेत आणि कोणत्या वृक्ष प्रजातींना यातून सूट दिलेली आहे, मालकी क्षेत्रातील कोणत्या वृक्ष प्रजातींना वाहतूकीतून सूट दिलेली आहे आणि कोणत्या वृक्ष प्रजातींना वाहतूकीतून सूट दिलेली नाही याबाबत, तसेच वृक्ष अधिकारी या नात्याने कोणी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याबाबत संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते.
वरील संदर्भिय निवेदनातून निदर्शनात आलेल्या बाबीः-
१. अधिकार नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून कार्यवाही होणे -
महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम 1964 मधील कलम 2 मधील [(च च) "वृक्ष अधिकारी" याचा अर्थ, वनक्षेत्रपालाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसलेला 'वन अधिकारी,' असा आहे.]
असे स्पष्ट नमूद असताना देखिल सदर अधियमाअंतर्ग वनविभागाचे वेगवेगळे अधिकारी /कर्मचारी कार्यवाही करत असतात वरील संदर्भिय निवेदनानुसार कायदयाने अधिकार नसताना दंड वसूलीची कार्यवाही वनपाल यांचेकडून झाल्याचे निदर्शनात येते.
२. सूट असलेल्या वृक्ष प्रजातींबाबत अधिनियमाअंतर्गत कार्यवाही होणे -
महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम 1964 मध्ये कलम 2 (च) मध्ये "झाड" याचा अर्थ, अनुसूचित विनिर्दिष्ट केलेले कोणेतेही झाडः आणि राज्य शासनाला कोणत्याही प्रकारच्या झाडाचे सरंक्षण करण्याच्या आवश्यकतेचा विचार केल्यानंतर राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अनुसूचित भर घालता येईल किंवा फेरबदल करता येईल; आणि कलम 15 च्या पोट कलम (2) च्या तरतूदी या जेथवर विधानमंडळापुढे ठेवण्याची आणि त्याच्याकडून फेरबदल केले जाण्याची संबंधित असतील तेथवर त्या, त्या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमांच्या संबंधात ज्याप्रमाणे लागू होतात त्याचप्रमाणे त्या अश्या अधिसूचनेच्या संबंधात लागू होतील;
2.0 असे असून, महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 1964 मध्ये अनुसूचीत (Schedule) वृक्षांची यादी स्पष्टपणे नमूद केलेली आहे. तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी शासनाने देखील अधिसूचना निर्गमित करून महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 1964 मधील (Schedule) यादीतील काही वृक्ष प्रजातींना वृक्ष तोडीतून सुट दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यास लागू असलेल्या भारतीय वन अधिनियम, 1927 कलम 41 च्या पोटकलम ३ तसेच महाराष्ट्र वन नियम 2014 याच्या नियम 31(1) च्या खंड (इ) या नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा तसेच त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन शासनाने वेळोवेळी अधिसूचना निर्गमित करुन काही वृक्ष प्रजातींना वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपासून सूट दिलेली आहे.

असे असताना देखील वनविभागाच्या क्षेत्रिय कर्मचारी / अधिकारी यांचेकडून महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 1964 अंतर्गत तोडीतून तसेच वाहतूकीतून सूट मिळालेल्या वृक्ष प्रजातींच्या बाबतीत कार्यवाही झालेचे निदर्शनात येते.

3.0 दिनांक 01.08.2017 च्या Revenue and Forest Department च्या अधिसूचनेद्वारा वृक्षतोडीबाबत The Maharashtra Land Revenue (Regulation of Right to Trees etc), Rule 1967 मध्ये जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार वृक्ष अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. दिनांक ०१/०८/२०१७ चे अधिसूचनेनुसार

For the purpose of this rule and rule ३, "Tree Officer" means a Forest Officer not below the rank of a 'Range Forest Officer' as defined under clause (ff) of section २ of the Maharashtra Felling of Trees (Regulation) Act, 1964 (Mah. XXIV of १९६४), and the forest officer means a Forest Officer as defined in the Indian Forest Act, 1927 (१६ ०८ 1927), in its application to the State of Maharashtra."
त्यानुसार वृक्ष अधिकारी -

१. कोणत्याही नदी, नाला, ओढा (ज्याचे पाणी डिसेंबर अखेर पर्यंत साचून राहते) यांचे काठाच्या टोकापासून 30 मिटर आत असलेल्या झाडांचा तोडीबाबत निर्णय घेवू शकतात.
२. उपनियम (१) अंतर्गत येत नसलेल्या कोणत्याही परिस्थितीत शेती योग्य नसलेल्या जमिनीतील किंवा शेतीच्या काही भागात ज्यामध्ये शेतीची आर्थिक लागवड शक्य नाही अश्या जागेतील किंवा शेतीच्या काही भागात झाडांची वाढ प्रति एकर २० झाडापेक्षा कमी असेल.

अश्या वरील बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार देखील वृक्ष अधिकारी यांना देण्यात आलेला असून, याबाबत देखील कायदयाचे योग्य अवलोकन होणे आवश्यक आहे.

४.० वरील बाबतीत कायदयाचे तसेच शासन सूचनांचे योग्य अवलोकन होऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे त्याकरीता तोडीतून, वाहतूकीतून सूट देणेत आलेल्या वृक्ष प्रजातींची यादी तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या अधिसूचना यासोबत सहपत्रीत करित आहोत. तरी मुख्य वनसंरक्षक (प्रादे.), (सर्व) यांना सूचित 

करणेत येते की, त्यांनी त्यांचे स्तरावरून सदर सूचना क्षेत्रिय कर्मचारी / अधिकारी यांना निर्गमित कराव्यात. तसेच कायदयाच्या योग्य अंमलबजावणीसाठी क्षेत्रिय कर्मचारी आधिकारी यांचेमध्ये कायद्याबाबत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचनाबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याने मुख्य वनसंरक्षक (प्रादे.), (सर्व) यांनी त्यांचे स्तरावर कार्यशाळा आयोजित करून क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदर्शन करावे.
 

Post a Comment

0 Comments