निलंबन कालावधीत कर्मचाऱ्याने कार्यालयात उपस्थित राहणे तसेच हजेरी स्वाक्षरी करणे बंधन कारक आहे का?
January 20, 2025
निलंबन कालावधीत कर्मचाऱ्याने कार्यालयात उपस्थित राहणे तसेच हजेरी स्वाक्षरी करणे बंधन कारक आहे का?
सर्वसाधारणपणे निलंबित कर्मचाऱ्याचे निलंबन आदेशामध्ये निलंबित शासकीय कर्मचाऱ्याने पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये तसेच त्यास कार्यलयात हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास आदेशित केले जाते असे दिसून येते. परंतु सदर निलंबन आदेशामध्ये कोणत्या नियमानुसार त्याने कार्यलयात उपस्थित राहवे हे नमुद केलेले नसते. महराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९ मध्ये प्रकारची कोणतीही तरतूद नाही. असे असतांना देखील कर्मचाऱ्यावर कार्यालयात उपस्थित राहाण्याबाबत सक्ती केली जाते. अशी सक्ती केल्यास कर्मचारी प्रवास भत्त्याची मागणी करु शकतो. निलंबनाधिन शासकीय कर्मचाऱ्याला कार्यालयात उपस्थित राहून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडणे ही बाब नियमबाहय असून शासकीय कर्मचाऱ्याला नाहक त्रास देण्याचाच हा एक भाग दिसून येतो.
0 Comments