संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकाऱ्यांची यादी बनविण्याबाबत.. शासन निर्णय दिनांक 30.10.2006
Friday, September 27, 2024
संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकाऱ्यांची यादी बनविण्याबाबत.. शासन निर्णय दिनांक 30.10.2006
शासकीय सेवकाची संशयास्पद सचोटी ठरविण्यासाठी पुढीलप्रमाणे निकष विचारात घेऊन विभाग प्रमुखांनी यादी तयार करावी :-
(अ) ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध सापळाप्रकरणी कारवाई झाली आहे, (ब) अपसंपदेप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाआहे, (क) ज्या अधिकाऱ्यांचे चारित्र्य संशयास्पद आहे, असे विभागप्रमुखांच्या लक्षात आले आहे व याबाबतीत सदर अधिकाऱ्याचे चारित्र्य संशयास्पद आहे हे स्पष्ट करणाऱ्या ठोस घटना/वर्तन उपलब्ध आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालामध्ये त्या अधिकाऱ्यांची सचोटी संशयास्पद असे नमूद करण्यात यावे व त्यासाठी ठोस कारणमीमांसा देण्यात यावी. तसेच, या अधिकाऱ्यांची नावे संशयास्पद सचोटीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. . विभागप्रमुखांनी वरीलप्रमाणे यादी तयार केल्यानंतर ती अॅन्टी करप्शन ब्युरोस पाठवावी. अॅन्टी करप्शन ब्युरो आवश्यकतेनुसार या अधिकाऱ्यांबाबत गुप्त चौकशी करुन त्यांचा अहवाल संबंधित प्रशासकीय विभागास सादर करतील. संबंधित प्रशासकीय विभागाने ही यादी अंतिम करुन त्यास शासनाची मान्यता प्राप्त करुन घ्यावी. अशा प्रकारे विभागप्रमुख, संबंधित प्रशासकीय विभाग व अॅन्टी करप्शन ब्युरो यांच्या सहमतीने ही यादी तयार करावी. तयार करण्यात आलेली अशी यादी तीन वर्षाकरिता प्रभावी राहील व दरवर्षी जुलै महिन्यामध्ये या यादीचे पुनर्विलोकन करण्यात येईल.
0 Comments