वनरक्षकांची सेवाज्येष्ठता ठरविण्याबाबत नियमातील तरतूद (seniority of Forest Guards)
वनविभागातातील क्षेत्र सव्र्व्हेक्षक गट-ब (अराजपत्रित), मुख्य लेखापाल, लेखापाल, सर्व्हेक्षक, वनपाल, लिपीक-नि-टंकलेखक व वनरक्षक गट-क पदांचे (सेवाप्रवेश) नियम २०११ हे दिनांक ३०/०६/२०११ चे अधिसूचनेन्वये प्रसिध्द झाले आहे. सदर नियमाचे नियम ९(३) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.
"नामनिर्देशनाद्वारे नेमणूक केलेल्या वनरक्षकाच्या नियुक्तीची आपसातील ज्येष्ठता, प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालक यांनी अंतिम परीक्षेनंतर अधिसूचित केलेल्या प्रशिक्षण विद्यालयाच्या गुणवत्ता यादीतील क्रमाच्या आधारावर ठरविण्यात येईल. जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे प्राप्त एकूण गुण सारखेच असल्यास त्यांच्या वयाच्या आधारावर जेष्ठता निश्तित केली जाईल. जे उमेदवार वयाने ज्येष्ठ असतील अशा उमेदवारांचा क्रम कमी वयाच्या उमेदवारांच्या वर ठेवण्यात येईल."
0 Comments