MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

कर्नाळा किल्ला व कर्नाळा पक्षी अभयारण्य

 कर्नाळा किल्ला व कर्नाळा पक्षी अभयारण्य

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पनवेलपासून अवघ्या १०-१२ कि.मी. अंतरावर लक्ष वेधून घेणारा हाताच्या अंगठ्यासारखा, गगनाचा वेध घेणारा एक बेलाग सुळका कर्नाळा किल्ला ! निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या, घनदाट वनराजीने नटलेल्या या परिसरात शासनाने १९६८ साली कर्नाळा पक्षी अभयारण्य घोषित केले. या अभयारण्यात दोन प्रकारची वने आढळतात- दमट मिश्र पानझडी वने व सदाहरीत नदीकाठची वने. या वनांमध्ये विविध प्रकारच्या वृक्ष प्रजाती, वेली, औषधी व दुर्मिळ प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात आहेत.


याबरोबरच रानमांजर, ससा, भेकर, रानडुक्कर, साळींदर, वानर इत्यादी सस्तन प्राणी व नाग, साप, अजगर, घोरपड, सरडे अशा अनेक वनचरांचा मुक्त वावर येथे आहे. पक्ष्यांचे तर हे माहेरघर आहे ! सर्पगरूड, ससाणा, घुबड या शिकारी पक्ष्यांबरोबर मोर, राखाडी धनेश, चातक, बुरखा हळद्या हरियाल, पर्वतकस्तुर, विविध प्रजातींच्या स्थलांतरीत पक्ष्यांची नोंद आजपर्यंत येथेघेण्यात आली आहे. निसर्गप्रेमी, अभ्यासक यांच्या पक्षी निरीक्षणासाठी ४ निसर्गवाटा तयार केल्या आहेत आणि विश्रामगृहे, कुटीर यामध्ये मागणीनुसार निवासाची उत्तम व्यवस्थाही येथे होऊ शकते. निसर्ग संवर्धनाबाबत जागृती व्हावी या हेतूने निसर्ग परिचय केंद्राची उभारणी येथे करण्यात आली आहे.
ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारा आणि निसर्ग संपन्नतेने समृद्ध 'कर्नाळा किल्ला' व पक्षी अभयारण्य आपण जीवापाड जपले पाहिजे.

<

Post a Comment

0 Comments