"ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor)" ह्या फुलपाखरास राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणेबाबत...शासन निर्णय दिनांक 05.08.2015
January 23, 2024
"ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor)" ह्या फुलपाखरास राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणेबाबत...शासन निर्णय दिनांक 05.08.2015
प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्यात शेकरू हा राज्य प्राणी, हरियाल हा राज्य पक्षी, आंबा हा राज्य वृक्ष आणि जारुल हे राज्य फूल अशी राज्य मानचिन्हे आहेत. फुलपाखरे ही सुदृढ पर्यावरण व सुदृढ परिस्थितीकीचे सूचक आहेत. महाराष्ट्रात फुलपाखरांची विविधता असूनही अद्याप राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले नव्हते. महाराष्ट्रातील फुलपाखरांच्या परिस्थितीकीय समतोल सांभाळण्याच्या कार्याबददल जनसामान्यात जागृती निर्माण करणे व फुलपाखराच्या जैव विविधतेच्या संवर्धनासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. "ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor)" हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. महाराष्ट्रातील बहुतेक वनांच्या प्रकारांचे ते प्रतिनिधीत्व करते. ते पश्चिम घाटापासून विदर्भापर्यंत सर्वत्र आढळते. महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ तसेच मुख्य वन्यजीव रक्षक हयांनी "ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor) " ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार राज्य वन्यजीव मंडळाने सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे. शासन निर्णय :- तद्नुसार महाराष्ट्र शासन याव्दारे "ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor) " ह्या फुलपाखरास राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०८०५१४५८३०७६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
0 Comments