मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या परतवाडा येथील बी.एस.पी. महाविद्यालयात एक आगळ्यावेगळ्या बँकेची उभारणी होत आहे. या बँकेत पैसेच्या विनिमयाऐवजी देशौ वाणाच्या बियाण्याचे आदानप्रदान होणार आहे. विशेष म्हणजे बँकेतील नियमानुसार व्याज, सरळव्याज, परतफेड, एफ.डी या बाबी इथे अनुभवाला मिळणार आहे. भावी पिढीच्या हरित भवितव्याची तजवीज या बँकेच्या माध्यमातून होणार आहे. भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून अनेक निसर्ग प्रेमी या कार्यात त्यांना सहकार्य करत आहे. आजची तरुण पिढी हि सध्या मोबाईलच्या विळख्यात सापडली असून ती निसर्गापासून दुरावली आहे . जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी जल, जमीन, जंगल यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तरुण पिढीला जैवविविधतेचे महत्व कळावे शिवाय दुर्मिळ, धोकाग्रस्त व लुप्त होणाऱ्या वनस्पतीचे संबर्धन व्हावे या उद्देशाने हि बैंक (पेढी) उभारली जाणार आहे. महाविद्यालयातील दोन खोल्यांमध्ये विविध कंटेनरमध्ये देशी वृक्ष, रानभाजी, वेली, गवत, धान्य, भरड धान्य, कंद आदी प्रजातींचे बीज संकलन केले जाणार आहे व सर्वसामान्य व्यक्तींसाठी ते मोफत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. याकरिता महाविद्यालयातील ३० जणाची चमू कार्य करणार आहे. यात २० विद्यार्थीसह प्राध्यापकांचा समावेश राहणार आहे. मेळघाटातील तिवस, पांढरा, पिवळा पळस, बाभळी, मेढसिंगी, रानबाभूळ, शमी, दहिपळस आदी १०० दुर्मिळ वनौषधी सह भरडधान्य राळा, सावा, कोदो, कुटकी, जगणी (तेलबिया) आदींची साठवणूक राहणार आहे. संपूर्ण देशात ग्रासमन म्हणून परिचित असलेले डॉ.गजानन मूरतकर, श्री नेमाडे जि.प. शाळा जैतादेहीचे मुख्याध्यापक गणेश जामुनकर, आदर्श शिक्षक जितेंद्र राठी, वर्नाषधी अभ्यासक अनिल चौधरी, निसर्ग अभ्यासक शशांक लावरे, धामणगाव गढी ग्रामवासी आदींचे या पेढीसाठी महत्वाचे योगदान लाभत आहे. दिनांक २३ डिसेंबर रोजी मिलींद गिरधारी, शिवशंकर चाफुले या वनस्पती अभ्यासकांच्या उपस्थितीत या बँकेचा शुभारंभ करण्याचा मानस भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी व्यक्त केला
Tag ## परतवाड्यातील बीज बँक | परतवाड्यात उभारतेय बीज बँक | मेळघाट बीज बँक | परतवाडा बीज बँक | अमरावती बीज बँक | मेळघाट व्याघ्र प्रकल्प बीज बँक| mahaforest
0 Comments