शेतात पडलेल्या काळ्या मल्चिंग पेपर मुळे मुक्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात.
मल्चिंग पेपरचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम
mulching paper effect in marathi
मनुष्य दिवसेंदिवस स्वतःच्या विनाशाचे खोल खड्डे खोदताना दिसून येत आहे व एकदिवस तो याच खड्यांत गाडला जाणार आहे हे मात्र नक्की. लालच कुणाला नसते व ही लालच सध्या भयंकर रूप धारण करताना पहायला मिळते. जेवढा मनुष्य लालची होत जाईल तेवढ्याच संकटांना तो जन्माला घालत राहील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मल्चिंग पेपरचे दुष्परिणाम
आज शेतकऱी तनांपासुन संरक्षण मिळावे म्हणून मल्चिंग नावाचं एक काळ विष विकत घेताना पहायला मिळतात. हे काळ विष सध्या शेतात अंथरूण तो त्यावर शेतीपिके घेत असतो. अनेक प्रकारच्या तनांपासुन त्यास मुक्ती मिळतही असेल परंतु एकदा का संपूर्ण पिक काढून झाले की हे काळ विष हमखास बांधावर किंवा ओढ्यांमध्ये टाकलेले पहायला मिळते आहे. ते नष्ट केले जात नाही.
मी अनेक ठिकाणी भटकंती केली या दरम्यान हे काळ विष सर्वत्र पसरलेले पहायला मिळते आहे. या प्लास्टिक मल्चिंग पेपर उन्हात तापुन त्यांचे छोटे छोटे तुकडे उडतात. हेच तुकडे प्राण्यांचा चारा असलेल्या गवताला जाऊन चिकटतात. आपण हा चारा गुरांना असाच टाकतो व ते प्राणी गवत खाऊन त्यांच्या पोटात हे प्लास्टिक मल्चिंग चे कण जाऊ लागलेत. हजारो जणावरांचे जीवन यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. येणाऱ्या काही वर्षांत आपली जनावरे जगतील का? ही भिती निर्माण झालेली असेल. कारण मेलेल्या जनावरांच्या पोटातुन हे काळ विषाचे पुंजके बाहेर पडताना दिसुन येत आहे.
आज शहरे व खेडेगावांत एवढी प्लास्टिक समस्या नसून ती शेतात पहायला मिळत आहे. कृपया या गोष्टींकडे लक्ष दिले गेले नाही तर भविष्यात जनावरे पहायला मिळतील याची शाश्वती देता येणे फार कठीण आहे. अनेक संकटे आपण निर्माण करत असुन एक दिवस आपणच आपल्या पायावर कु-हाडीचा घाव घालून घेणार आहोत हे मात्र नक्कीच. पहा पटतंय का?
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक


0 Comments