MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

बेहडा Terminalia bellirica

 बेहडा Terminalia bellirica information in marathi

बेहडाचा स्वरूप व आढळ : behada information in marathi 

 हा मध्यम ते मोठा १० ते १२ मीटर पर्यंत उंच वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष पानझडी किंवा मोसमी जंगलात आढळतो.

बेहडा
Behada 

बेहडा ची फुले व फळे येण्याचा कालावधी

 बेहडा या वृक्षास जानेवारी-फेब्रुवारीत फुले व जून-जुलै मध्ये फळे येतात.

उपयुक्त भाग 

या वृक्षाची साल, फळे व बिया हे उपयुक्त भाग आहेत.

उत्पादन क्षमता

: एका परिपक्व वृक्षापासून दरवर्षी अंदाजे २ क्विंटल पर्यंत फळे प्राप्त होऊ शकतात.

औषधी उपयोग behada benifit in marathi 

 बेहडा हा त्रिफळा चूर्णातील एक घटक असून बियांच्या आवरणात उत्तेजक गुण असतात. फळांपासून तेल काढून ते केस समृद्धी करीता व संधीवाताच्या सुजेवर वापरतात. डोळ्यांच्या रोगावर सुकलेला बेहडा मधात उगाळून लेप देतात. फळातील गर गुंगी आणण्यासाठी वापरतात. तसेच ताप आल्यास व पोट साफ होण्यासही याचा उपयोग करतात, हे फळ जीवाणू प्रतिबंधक आहे. या वृक्षाची साल पंडुरोग, कोड यावर उपयोगी आहे. सालीचा टॅनीनसाठी उपयोग करतात. बियांवरील आवरणापासून अखाद्य तेल तयार केले जाते. साबण तयार करण्यासाठी बेहड्याची साल गुरांस भाकरीतून खाऊ घातल्यास किडे नाहीसे होतात. बीबा उतल्यास बेहड्याच्या फळांतला मगज उगाळून लावतात.

संग्रहण पद्धती : behada information in marathi 

जेव्हा फळ परिपक्व होऊन पिवळसर रंगाचे होतात. तेव्हा १०% फळ सोडून उर्वरित फळांचे संग्रहण करावे.

काढणीनंतरची प्रक्रिया :

 फळे खाली पडल्यानंतर त्याचा गर ताबडतोब काढून सावलीत सुकवावा व बिया उन्हात सुकवाव्यात.

Behada
बेहडा फळ

औषध कालमर्यादा :

 वाळलेली फळे बिया ८ ते १० महिने.

Post a Comment

0 Comments