आवळा ( Phyllanthus emblica ) information in marathi
स्वरूप व आढळ :-
हा मध्यम आकाराचा वृक्ष असून पानझडीच्या जंगलात आढळतो.
फुले व फळे येण्याचा कालावधी :-
जानेवारी-फेब्रुवारीत फुले व मार्च-एप्रिल मध्ये फळे येतात.
उत्पादन क्षमता :
एका परिपक्व आवळा वृक्षापासून दरवर्षी २ ते ५ क्विंटल पर्यंत आवळा फळे प्राप्त होतात.
उपयोग :
आवळ्यात जीवनसत्त्व 'क' चे प्रमाण भरपूर असल्यामुळे याचे सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढते. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे स्कर्व्ही सारखे रोग बरे करण्यास आवळा प्रभावी आहे. आवळा वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा नाशक आहे. आवळ्याच्या अंगभूत थंडपणामुळे शरीरातील पित्त, कडकी, उष्णता, उन्हाळी लागणे, पांढरी धुपनी, कोठूनही अचानक रक्तस्त्राव होणे, डोळ्यांची जळजळ, हातपाय दुखणे, घश्यातील आग यामध्ये उपयोगी आहे.
आवळ्यापासून नित्योपयोगी पदार्थ जसे आवळ्याचा मुरब्बा, सॉस, कॅण्डी, जेली, लोणचे, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण इत्यादी तयार करण्यासाठी मोठी मागणी आहे.
संग्रहण पद्धती :-
जेव्हा फळ परिपक्व होऊन पिवळसर रंगाचे होतात. तेव्हा १०% फळ सोडून उर्वरित फळांचे संग्रहण करावे. फळांना बांबूमध्ये फसवून तोड करावे.
काढणीनंतरची प्रक्रिया:-
फळ काढणी नंतर ती ओली विक्रीस पाठवता येतात. याशिवाय फळांचे तुकडे करून सावलीत सुकण्यास ठेवावीत व बिया वेगळ्या कराव्यात.
औषध कालमर्यादा :-
वाळलेली फळे, फळाची साल, खोडाची साल, पाने, बी १ वर्ष.
0 Comments