महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक २० जुलै २०१३.
अधिसूचना
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२.
क्रमांक डब्ल्यूएलपी - ०६१३ / प्र. क्र. १९९ /फ-१. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा अधिनियम क्रमांक ५३) याच्या कलम ४, पोट-कलम (१), खंड (क) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत, वेळोवेळी काढण्यात आलेल्या यापूर्वीच्या सर्व अधिसूचना व आदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याव्दारे, महाराष्ट्र राज्याकरिता, मुख्य वन्यजीव रक्षक म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. यु. एम. फारूकी,
शासनाचे सह सचिव
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 20th July 2013.
NOTIFICATION
WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972.
No. WLP-0613/CR-199/F-1.- In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 4 of the Wild Life (Protection) Act, 1972 (No. 53 of 1972), in its application to the State of Maharashtra, and in supersession of all previous Notifications and Orders, issued from time to time, in this behalf, the Government of Maharashtra is hereby pleased to appoint the Principal Chief Conservator of Forests (Wildlife), Maharashtra State, as the Chief Wild Life Warden for the State of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. U. M. FAROOQUI,
Joint Secretary to Government.


0 Comments