वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सूचना
वन कर्मचारी यांच्या अडी अडचणी बाबत. परिपत्रक - दिनांक 30.03.2019
क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या वनपाल, वनरक्षक, वनमजूर तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे काही प्रकरणी असे निदर्शनास आले आहे की त्यांचे रजा, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय उपचारासाठी अग्रिम/प्रतिपूर्ति, विशेष वेतन इत्यादि बाबत वेळेवर कार्यवाही होत नाही. कार्यालयात विषय हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठपुरावा करावा लागतो. सदर बाब विचार करून सूचना देण्यात येते की, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक, उप वन संरक्षक विभागीय वन अधिकारी यांनी त्यांच्या क्षेत्रीय दौऱ्याच्या वेळी कर्मचान्यांच्या अडी-अडचणी बाबत विचारणा करून घ्यावी व त्याची नोंद घेऊन, त्या सोडविण्याबाबत कार्यवाही करावी व अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा.
२. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), उप वन संरक्षक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना इत्यादि विभागांनी त्यांच्या कार्यालयात रजा मंजूरी, स्वग्राम रजा प्रवास सवलत, वैद्यकीय प्रतिपूर्ति प्रकरणे, विशेष वेतन, भविष्य निर्वाह निधी या सर्व विषया संबंधी प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. सदर नोंदवहीत जसे जसे अर्ज प्राप्त होतात त्या अनुक्रमाने सदर अर्जाबाबत वही मध्ये नोंद घेवून अनुक्रमानुसार सदर प्रकरणे मंजूरी करिता सक्षम अधिकारी यांचे कडे सादर करण्यात येतील व त्याक्रमानुसार प्रकरणे निकाली काढण्यात येतील याची दक्षता घेण्यात यावी. मासिक आढावा बैठकी मध्ये तसेच व्ही.सी. मध्येही कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणीबाबत व निरनिराळ्या विषयाबाबत नोंदवही ठेवून प्रकरण प्राप्त झालेल्या क्रमानुसार निकाली काढण्यात येते किंवा कसे याचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्या जातील याकरिता पाठपुरावा करावा.
3. काही वन विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे याबाबत प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी नोंद घेऊन वेळेवर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले गेले किंवा कसे याची शहानिशा करावी व वेळेवर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.
४ प्रत्येक मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आस्थापना बाबी आढावा घेण्यासाठी
प्रादेशिक वनविभाग, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना, शिक्षण प्रशिक्षण, मूल्यांकन इत्यादि सर्व कार्यालयातील संबंधित विषय हाताळनाऱ्या कार्यालय अधिक्षक, मुख्य लेखापाल, लेखापाल यांची आढावा बैठक घेवून आस्थापणा विषयक प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच निरनिराळ्या विषयाबाबत विषय निहाय नोंदवही ठेवून क्रमाने प्रकरणे निकाली काढण्यात येते किंवा कसे याचा पाठपुरावा करावा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी व्ही.सी. मध्ये व आढावा बैठकीत आस्थापणा विषयक प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन पाठपुरावा करावा.
0 Comments