मानव–वन्यजीव संघर्षात मानवी मृत्यू : तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत वन विभागाच्या सूचना
राज्यात मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मानवी जिवीतहानी तसेच मनुष्य जखमी होण्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जिवीतहानी होणे हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने, अशा घटनांची माहिती संबंधित कार्यालयास तात्काळ कळविणे आवश्यक आहे. मात्र, मानवी जिवीतहानीच्या प्रकरणांची माहिती वेळेत प्राप्त होत नसल्याबाबत संबंधित पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जिवीतहानी झालेल्या प्रकरणांमध्ये आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मा. मंत्री (वने) किंवा मा. प्रधान सचिव (वने) यांच्याकडे करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत तात्काळ विचारणा केली जाते. संबंधित माहिती या कार्यालयास उपलब्ध न झाल्यास त्यांना आवश्यक माहिती सादर करणे शक्य होत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्षात मानवी मृत्यूची घटना घडल्यास तात्काळ किंवा जास्तीत जास्त तीन तासांच्या आत मुख्य वन्यजीव रक्षक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयास ई-मेलद्वारे मानवी मृत्यूच्या घटनेचा आवश्यक तपशील पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत सर्व संबंधितांनी गंभीरतेने नोंद घेण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
मानवी मृत्यू प्रकरणात तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत
प्रपत्र-अ
(१) वन विभाग ---------------- वनपरिक्षेत्र ---------------- वृत्त ----------------
नियतेक्षेत्र ---------------- कक्ष क्र./सर्व्हे क्र. ---------------- खाजगी शेत असल्यास गट क्र./भू.क्र. ----------------
शेतमालकाचे नाव (लागू माहिती असल्यास) ---------------- घटना जंगलाबाहेर/जंगलाचे आत ----------------
घटना व्याघ्र प्रकल्पाबाहेर अथवा आत ---------------- वनक्षेत्रापासून अंतर ---------------- कि.मी. जीपीएस रिडींग ----------------
(२) मृत व्यक्तीचे नाव ---------------- वय ---------------- घटनेचा दिनांक ----------------
महिला/पुरुष ---------------- राहणार ----------------
(३) घटनास्थळी जाण्याचे प्रयोजन (गुरेचराई, जळाऊ लाकूड, संकलन, इत्यादी) ----------------
(४) हल्ला करणारा वन्यप्राणी ----------------
(५) घटनास्थळावर आढळलेल्या हल्ला करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या खुणा ----------------
(६) इस्पितळात दाखल केले असल्यास इस्पितळाचे नाव ----------------
(७) तातडीने देण्यात आलेली मदत ----------------
(८) घटनास्थळी भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचे नांव
१. ---------------- हुद्दा ---------------- संपर्क क्रमांक ----------------
२. ---------------- हुद्दा ---------------- संपर्क क्रमांक ----------------
३. ---------------- हुद्दा ---------------- संपर्क क्रमांक ----------------
(९) सदर हल्ला करणाऱ्या प्राण्यामुळे पूर्वी झालेल्या घटना (मागील ३० दिवसात) ----------------
(१०) सदर प्राण्यास जेरबंद करण्याचे आदेश आहेत काय ? होय / नाही ----------------
(११) सदर क्षेत्रात मानवीहानी टाळण्यासाठी व प्राण्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेली उपाययोजना/प्रस्तावित उपाययोजना.
१) लावण्यात आलेले कॅमेरा ट्रॅप्स.
२) प्राथमिक बचाव दल (PRT).
३) RRT व इतर.
सन १ एप्रिल २०२४ ते आजतागायत झालेल्या मनुष्य मृत्यूच्या प्रकरणाचा तपशील वरील प्रपत्रामध्ये भरून या कार्यालयास न चुकता सादर करावा. मानवी मृत्यूच्या घटनेच्या प्रकरणाची माहिती घटना घडल्यापासून २४ (चोवीस) तासांत ईतर अनुषंगिक माहितीसह लेखी अहवाल या कार्यालयास न चुकता सादर होईल याची दक्षता घ्यावी. मानव-वन्यजीव संघर्षात मानवी मृत्यूच्या प्रकरणी हयगय व टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
--------------------
मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये मानवी जिवीतहानी झाल्यास संबंधित माहिती तात्काळ आणि निर्धारित कालावधीत वरिष्ठ कार्यालयास सादर करणे आवश्यक असल्याचे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा घटनांमध्ये आवश्यक तपशील वेळेत उपलब्ध झाल्यास पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती सादर करणे सुलभ होते.
यासंदर्भात पत्र क्रमांक :- कक्ष-23(6)/प्र.क्र.123/22-23/2994/14-25, दिनांक :- 20/11/2024 हे पत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्र. कक्ष-23(6)/प्र.क्र.123/22-23/2994, दिनांक 10/01/2024 असा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रानुसार, मानव–वन्यजीव संघर्षात मानवी मृत्यूची घटना घडल्यास तात्काळ किंवा जास्तीत जास्त 3 तासांच्या आत ई-मेलद्वारे घटनेचा आवश्यक तपशील संबंधित कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
------------

0 Comments