MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

भारतीय वन अधिनियम, 1927 : कलम 28 — ग्राम वने बनविणे

महाराष्ट्रातील ग्राम वने : भारतीय वन अधिनियम, 1927  मधील तरतुदी

भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 28 अंतर्गत ग्राम वने बनविण्याची तरतूद

प्रकरण 3 — ग्राम वनांबाबत

भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 

वन कायद्याचे कलम 28. ग्राम वने बनविणे

(1) जी कोणतीही जमीन राखीव वन म्हणून गठित झाली असेल किंवा जिचे संरक्षित वन म्हणून वर्गीकरण झाले असेल, अशा कोणत्याही जमिनीच्या संबंधातील किंवा त्या जमिनीवरील शासनाचे हक्क राज्य शासन कोणत्याही ग्रामीण समाजाकडे, “मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958” अन्वये स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही ग्रामपंचायतीकडे किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960  अन्वये नोंदविलेल्या किंवा नोंदणीकृत मानल्या गेलेल्या कोणत्याही सहकारी संस्थेकडे अभिहस्तांकित करू शकेल आणि असे अभिहस्तांकन रद्द करू शकेल. अशा रीतीने अभिहस्तांकित करण्यात आलेली सर्व वने “ग्राम वने” म्हणून संबोधली जातील.

(2) अशा ग्राम वनांच्या व्यवस्थापनाचे विनियमन करण्यासाठी, तसेच ज्या समाजाकडे, पंचायतीकडे किंवा संस्थेकडे अशा प्रकारे हक्क अभिहस्तांकित करून देण्यात आले असतील, त्या समाजास, पंचायतीस किंवा संस्थेस कोणत्या अटी व शर्तींवर इमारती लाकूड किंवा इतर वनउत्पादन अथवा गुरांसाठी कुरणांचा पुरवठा करण्यात येईल, त्या अटी व शर्ती विहित करण्यासाठी आणि अशा वनांचे संरक्षण करण्यासंबंधी त्यांची कर्तव्ये विहित करण्यासाठी राज्य शासन नियम तयार करू शकेल.

(3) राखीव किंवा संरक्षित वनांसंबंधी या अधिनियमाच्या सर्व तरतुदी, अशा रीतीने केलेल्या नियमांशी त्या जेथे विसंगत नसतील तेथपर्यंत, अशा ग्राम वनांना लागू होतील. अशा ग्राम वनांमध्ये हक्क अभिहस्तांकित केलेली वने राखीव वने असतील तर राखीव वनांच्या संबंधातील तरतुदींप्रमाणे आणि अशी वने संरक्षित वने असतील तर संरक्षित वनांच्या संबंधातील तरतुदींप्रमाणे या तरतुदी लागू होतील.

ग्राम वन म्हणजे काय?

भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 28 नुसार, शासनाचे वनावरील काही हक्क ग्रामीण समाज, ग्रामपंचायत किंवा संबंधित सहकारी संस्थेकडे अभिहस्तांकित करून दिल्यानंतर अशी वने “ग्राम वने” म्हणून ओळखली जातात. ग्राम वनांचे व्यवस्थापन, वनउत्पादनाचा पुरवठा आणि वनसंरक्षणासंबंधी कर्तव्ये यासाठी राज्य शासन नियम तयार करू शकते. 

टीप : महाराष्ट्रात कलम 28 संदर्भात स्वतंत्र नियम करण्यात आले आहे भारतीय वने (महाराष्ट्र) (ग्रामवने नेमून देणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व ती रद्द करणे यांचे विनियमन) नियम, 2014 ”




भारतीय वन अधिनियम 1927 कलम 28, ग्राम वने, ग्राम वन म्हणजे काय, Section 28 Indian Forest Act 1927, Village Forests, महाराष्ट्र ग्राम वने, ग्राम वन व्यवस्थापन

Post a Comment

0 Comments