MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 32 : वनउपज पास देण्याचा अधिकार कोणाला? जाणून घ्या संपूर्ण नियम

 महाराष्ट्र वन नियमावली 2014 : नियम 32 – पास देणारे अधिकारी आणि व्यक्ती

(1) या नियमाखालील खालील अधिकारी आणि व्यक्ती यांना पास देण्याचे अधिकार राहतील :—

अधिकारी

(अ) मुख्य वनसंरक्षक, उप वनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक किंवा मुख्य वनसंरक्षक अथवा उप वनसंरक्षक यांनी लेखी प्राधिकृत केलेले कोणतेही अधिकारी यांना या नियमानुसार पास देण्याचे अधिकार असतील;

मात्र, खालील प्रजातींचे इमारती लाकूड अथवा त्यापासून प्राप्त होणारे वन-उपज यांना पास देताना संबंधित सहाय्यक वनसंरक्षक यांची स्वतःची मोहर आणि सहीनुसार पास जारी होतील :—

(i) Acacia catechu (खैर वृक्ष)

(ii) Dalbergia latifolia (रोजवुड वृक्ष)

(iii) Mangrove species (कांदळवनांच्या प्रजाती)

(iv) नरक्या (अमृता वृक्ष)

(v) Santalum album (चंदन वृक्ष) आणि

(vi) Red sanders (रक्त चंदन)

(ब) खालील प्रजातींच्या इमारती लाकडाचे घनफळ 8 घनमीटरपेक्षा जास्त आणि लहान लाकडाचे घनफळ 20 घनमीटरपेक्षा जास्त असेल त्यावेळेस सहाय्यक वनसंरक्षक यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्व मंजुरीशिवाय पास जारी करता येणार नाही :—

(i) Adina cardifolia (हळदू किंवा हादू)

(ii) Artocarpus integrifolia (फणस)

(iii) Hardwickia binata (अंजन)

(iv) Madhuca latifolia (मोह अथवा मोहवा अथवा महुवा)

(v) Mangifera indica (आंबा किंवा आम)

(vi) Ougeinia dalbergioides (तिवस)

(vii) Pterocarpus marsupium (बीजा किंवा बीजा साल)

(viii) Syzigium cumini (जांभूळ किंवा जामून)

(ix) Tamarindus indica (चिंच किंवा इमली)

(x) Tectona grandis (साग किंवा सागवान)

(xi) Terminalia chebula (हिरडा किंवा हर्रा)

(xii) Terminalia paniculata (किंजळ किंवा किंजल)

(xiii) Terminalia tomentosa (ऐन किंवा सादडा किंवा साजा)

स्पष्टीकरण

“लहान लाकूड” म्हणजे सर्वात मोठ्या भागातील 25 से.मी. पेक्षा कमी व्यासाचे आणि 2 मीटर लांबीपर्यंतचे सर्व लाकूड.

(क) मुख्य वनसंरक्षक अथवा उप वनसंरक्षक यांच्या वतीने याकरिता प्राधिकृत केलेल्या सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पूर्व मंजुरीशिवाय एक कॅलपिनिक टनापेक्षा जास्त कोणत्याही प्रजातींचे बांबू करिता पास जारी करण्यात येणार नाही.

स्पष्टीकरण

“एक कॅलपिनिक टन” म्हणजे बांबूच्या नगांची एकूण लांबी 2000 धावते मीटर बरोबर असेल.

इतर व्यक्ती

(ड) मुख्य वनसंरक्षक अथवा त्यांनी त्यांच्या वतीने लेखी शक्ती प्रदान केलेले उप वनसंरक्षक, कोणत्याही वन-उपज मालकास किंवा त्याच्या अभिकर्त्यास प्राधिकृत करू शकतात. या अधिकारपत्रात प्राधिकरणाची मुदत नमूद राहील.

परंतु, मुख्य वनसंरक्षक हे आयुक्त, उत्पादन शुल्क यांच्याशी विचारविनिमय करून विशिष्ट क्षेत्रातून मोहाफुले हलविण्याकरिता, स्थानिक उत्पादन शुल्क अधिकारी, जो उप निरीक्षक या दर्जापेक्षा खाली नसेल, यांना पास देण्याचे अधिकार देऊ शकतील.

(2) अधिकार पत्र जारी करणारा अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ असे प्राधिकरण केव्हाही रद्द करू शकतात.

-----------------------

महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31

------------------------

महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 32 – पास देणारे अधिकारी आणि व्यक्ती

महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 32, महाराष्ट्र वन नियम 2014, वनउपज पास देणारे अधिकारी, वनउपज वाहतूक पास, वनउपज पास देण्याचा अधिकार, वनउपज वाहतूक नियम महाराष्ट्र, महाराष्ट्र वन विभाग पास नियम, वनउपज वाहतुकीसाठी पास, नियम 32 महाराष्ट्र वन नियमावली, महाराष्ट्र वन विभाग नियम 32, Forest Rules 2014 Maharashtra, Maharashtra Forest Rules 2014 Rule 32, Rule 32 Maharashtra Forest Rules, Forest Produce Transit Pass Maharashtra, वनउपज पास कोण देतो, वनउपज वाहतूक पास देण्याचे अधिकार.

----------------

Post a Comment

0 Comments