राज्यातील मानव वन्यजीव संघर्षग्रस्त माकडे (Rhesus Macaque) / वानरे (Semnopithecus entellus) यांना बचावाकरीता पकडणे व अधिवासात सोडणे याकरिता कार्यप्रणाली सुनिश्चित करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 22.04.2026
राज्यात वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने माकडे (Rhesus Macaque) व वानरे (Semnopithecus entellus) यांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी नवीन कार्यप्रणाली लागू केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांची सुरक्षितता राखण्यास तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे. माकड/वानर पकडण्यासाठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, बचाव मोहिमेदरम्यान सुरक्षितपणे पकडून अधिवासात सोडलेल्या प्रत्येक माकडासाठी सरसकट रु. ६०० दर अदा करण्यात येणार आहेत. हे दर शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहतील. तसेच यापूर्वीच्या शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून वनविभागाच्या कार्यवाहीस अधिक गती आणि स्पष्टता मिळणार आहे.

0 Comments