MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन्यजीव शिकार प्रकरणात आलापल्ली वनविभागाची मोठी कारवाई

 🦌 वन्यजीव चितळ शिकार प्रकरणात आलापल्ली वनविभागाची मोठी कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात चितळ (Axis axis) या संरक्षित वन्य प्राण्याच्या शिकारीचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक 09 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास FDCM वन वसाहत, नागेपल्ली येथे धाड टाकली.

धाड टाकल्यावर, चितळ प्राण्याचे मास शिजवताना एक आरोपी रंगेहात पकडण्यात आला. सदर कारवाई आलापल्ली वनविभागाचे मा. उपवनसंरक्षक तसेच प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून माहिती घेतल्यानंतर, 10 जुलै 2025 रोजी इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय वन अधिकारी, आलापल्ली व अहेरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी/कर्मचारी प्रकरणाची चौकशी / तपास करत आहेत.

प्रेसनोट 


चितळ शिकार, गडचिरोली शिकार प्रकरण, नागेपल्ली चितळ, वन्यजीव संरक्षण अधिनियम, अहेरी वनपरिक्षेत्र, आलापल्ली वनविभाग, वन गुन्हा, FDCM नागेपल्ली

गडचिरोलीत चितळ शिकार प्रकरण उघड – पाच आरोपी अटकेत!
2. नागेपल्ली येथे चितळ शिजवतांना एकजण रंगेहात पकडला, चौघे आरोपी नंतर अटकेत
3. FDCM वसाहतीत वन्यप्राण्याचे मास शिजवताना कारवाई – वनविभागाची यशस्वी धाड
4. वन्यजीव शिकार प्रकरणात गडचिरोली वनविभागाची मोठी कारवाई
5. चितळ शिकार प्रकरणाचा पर्दाफाश – आलापल्ली वनविभागाची यशस्वी तपासमोहीम

Post a Comment

0 Comments