वननकाशे आणि वनविभाग या विषयी सविस्तर माहिती
वन नकाशाची सुरुवात
ज्याप्रमाणे घर बांधताना घराचा नकाशा किंवा ब्ल्यू प्रिंट याची गरज असते , आपली जमीन किती व कुठे आहे यासाठी लोक सातबारा काढतात, त्याचप्रमाणे वन विभागाचे अस्तित्व टिकण्यासाठी वनांचे टोपोशीट्स म्हणजेच नकाशे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. कितीही डिजिटल युग येऊ द्यात अथवा उपग्रहाने सर्वेक्षण होऊ द्या मूळ ब्रिटिश अचूक नकाशे हेच महत्त्वाचे असतात._
ब्रिटिशांनी अत्यंत हुशारीने भारतातील कानाकोपऱ्याची लांबी रुंदी उंची मोजून त्याचा उपयोग स्वतःच्या सत्ता स्थापनेसाठी केलेला दिसतो यामध्ये भारतात सर्वत्र सत्ता नसतानाही कर्नल अलेक्झांडर रीड याचे हाताखाली डब्ल्यू मॅथर याने १७९३ ते १७९६ या काळात दक्षिणेत बारा महल भागामध्ये सर्वे केलेला दिसून येतो.
यानंतर द ग्रेट ट्रिग्नोमॅट्रिक सर्वे हा १८०२ मध्ये सुरू झाला जो कर्नल विल्यम लॅम्बटोन याने १० एप्रिल, १८०२ मध्ये सुरू केला व दक्षिण भारतात सुरू झालेल्या सर्वेची शेवट लेफ्टनंट जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 1852 मध्ये केला. यात सर्व भारत बर्मा बांगलादेश पाकिस्तान हा जुना भारताचा सर्व भूभाग नकाशा वरती यशस्वीरित्या आला. भारतीय राज्यकर्तेही काही प्रमाणात नकाशे बनवून घ्यायचे, मात्र ब्रिटिशांसारखे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने नकाशा बनवणे व वाचन पद्धत ही याआधी भारतात नव्हती. एकूण एक इंच जागेचा बनवलेला नकाशा, तारायंत्रासारखी आधुनिक साधने यामुळेच ब्रिटिश भारतावर पकड ठेवू शकले.
वन विभागाची स्थापना
वनविभागाची स्थापना ही अंदाजे १८३४ साली झालेली दिसून येते. या काळामध्ये ब्रिटिश सरकार उभ्या झाडांची जंगलेच्या जंगले ही ठेकेदारांना तोडण्यासाठी देत असत यांना ब्लॉक रिझर्व फॉरेस्ट असा शब्द होता. यातील काही ब्लॉक रिझर्व हे वीस ते तीस हजार एकराचे ही आढळून येत. उदाहरणार्थ सातपुडा खानदेश भागात फैजपूर भागामध्ये तालुक्याचे तालुके हे ब्लॉक रिझर्व फॉरेस्ट होते व कागदपत्रे अजूनही आहेत. मात्र ब्रिटिश हे वनांकडे पैसे मिळवून देणारे साधन या नजरेने बघत असल्याने व त्या काळामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या जागतिक आधुनिकीकरणामुळे रेल्वे लाईन, जहाजे बांधणे इत्यादीसाठी लाकडाची मागणी प्रचंड वाढली होती व भारतामध्ये अतिशय जुनी प्रचंड झाडांची जंगले ज्यामध्ये हजारो वन्य प्राणी राहायचे ही आयतीच ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्याने या जंगलांचा भयानक विनाश सुरू झाला. सर्वत्र उजाड भकास टेकड्या गरम हवा वाहू लागली.
भारताचा पहिला वन कायदा
यामध्येच Dr. Dietrich Brandis हा भारतातील पहिला इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट म्हणून नेमला गेला. काहीजण याला भारतीय जंगले उजाडणारा तर काही वने लावणारा असेही म्हणतात. मात्र पहिला भारतीय वन कायदा जो १८६५ मध्ये बनवला गेला तो बनवण्यासाठी या महाशयाने बरेच परिश्रम घेतले होते. या काळामध्ये जनता ज्याला शिव्या घालते त्या लॉर्ड डलहौसी याने १८५५ मध्ये जंगले वाचवायची सुरुवात केली व याचबरोबर जंगलाचे व्यापारीकरण करून सागवानाची लागवड ही चालू केली. हा १८६५ चा वन कायदा नंतर १८७८ मध्ये सुधारण्यात आला व त्यात आणखी सुधारणा करून १९२७ चा वन कायदा अस्तित्वात आला जो आपण अजूनही वापरतो.
अलेक्झांडर गिब्सन यांचे योगदान
भारतातील जंगलांना खरा वाचवणारा इसम या सर्व नाटकामध्ये अवतीर्ण झाला, त्यांचे नाव म्हणजे डॉक्टर अलेक्झांडर गीबसन, उणेपुरे ६७ वर्ष जगलेला हा माणूस भारताच्या जंगलांवर विशेषता महाराष्ट्र आणि संपूर्ण पश्चिम घाटावर मेहरबानीच करून गेला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मूळतः वनस्पती शास्त्रज्ञ असलेला हा माणूस स्कॉटिश होता आणि दिवसाला आठ मैलां पैकी चार घोड्यावर तर चार मैल पायी चालून त्याने संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालून चालू असलेली प्रचंड वृक्षतोड आणि लोकांमध्ये वन लागवडीसाठी असलेली निराशा पाहिली होती. सर्वसामान्य लोकांना जंगले वाचवणे व त्याचबरोबर नवीन वृक्षारोपण करणे हा संदेश देणे हे किती महत्त्वाचे आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्यानंतरच भारतीय वने वाचवायचा सुवर्णकाळ सुरू झाला. यांनाच फादर ऑफ इंडियन फॉरेस्टरी असे म्हणले जाते. माझ्याजवळ उपलब्ध कागदपत्रांनुसार डॉक्टर साहेबांना ऑगस्ट १८५६ मध्ये खानदेशात प्रवास करताना ८ रुपये ११ पैसे ३ आणे प्रवास भत्ता खर्चासाठी मिळालेला दिसतो.
निम्माहुन अधिक काळाचे आयुष्य यांनी भारतामध्येच घालवले. १८३८ ते १९४७ मध्ये ते दापोडी बॉटनिकल गार्डनचे प्रमुखही होते .आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे की जुन्नर जवळील हिवरे बाजार भागामध्ये त्यांचे बराच वेळ राहणे होते व त्यांच्या बायकोने त्यांची कुकडी धरणाजवळ बांधलेली समाधी व त्यांनी स्वहस्ते लावलेले महोगनी वृक्षाचे प्रचंड मोठे झाड अजूनही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभे आहेत. प्रत्येक वृक्षप्रेमीने पहावी अशी जागा.सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेले नकाशे
वन विभागाचा सर्व डोलारा हा सर्वे ऑफ इंडियाने ब्रिटिश काळापासून वेळोवेळी बनवलेली टोपोशीटस, कंपार्टमेंट नकाशे, कुप कंट्रोल, बॉड्री डीमार्केशन रजिस्टर म्हणजेच हद्दीच्या खुणांची नोंद ठेवलेले रजिस्टर, फॉर्म नंबर एक, जुने सर्वे नंबर असलेले गाव नकाशे इत्यादी जवळपास ५४ प्रकारची कागदपत्रे यावरच उभा असायला हवा. यावर देखरेख ठेवणारे इतर वर्किंग प्लॅन अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वेअर हे वनविभागाचा कणा असतात. वन जमिनीमध्ये झालेले बदल, जर कोणी अतिक्रमण केले असेल तर ते वनविभागाच्या हद्दीत आलेले आहेत का, हद्दीचे बुरुज हलवलेले आहेत का इत्यादी सर्व गोष्टी यांच्या शिवाय कळणे अवघड होते.
लॉर्ड डलहौसी याचे योगदान
वर उल्लेखल्याप्रमाणे लॉर्ड डलहौसीच्या आग्रहानुसार भारतातील वने परत एकदा वाढवायचा व शास्त्रीय पद्धतीने कापायचाही प्रयत्न सुरू झाला. त्यामध्येच १८६५ मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश सरकारने वने जपणे, लावणे व कापण्यासाठी ही नियम बनवले._
तोपर्यंत ब्रिटिश सरकारने गावच्या गावे तालुक्याच्या तालुके ब्लॉक रिझर्व फॉरेस्ट अंतर्गत आणलेले होते. गावाची म्हणजेच महसुली जमीन कमी व प्रचंड संख्येने वने ही अवस्था सर्व भारतामध्ये होती. त्यामुळे गावाशेजारी मोठा पट्टेरी वाघ निघणे ही नेहमीचीच गोष्ट असायची. वर उल्लेख केल्याप्रमाणे १८७८ मध्ये या नियमांमध्ये सुधारणा करून प्रत्यक्षात पहिल्यांदाच व्यवस्थित असा वन कायदा अस्तित्वात आला. यासाठी ब्रिटिश सरकारने अत्यंत हुशारीने १८७७ पर्यंत सर्व प्रकारच्या वनांचा सर्वे पूर्ण केला होता व त्यानंतरच त्यांनी जुनी वने तशीच ठेवून नवीन व जुनी व काही नवीन ठिकाणीही वने जाहीर केली.
वन म्हणल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर दाट जंगल उभे राहते मात्र तसे नसून विविध प्राण्या पक्षांना वेगवेगळ्या प्रकारचा अधिवास लागतो. म्हणजे उजाड खुरट्या झुडपांच्या माळरानावर राहणारे पशुपक्षी वेगळे, दलदली मध्ये राहणारे वेगळे , कुरणांमध्ये वेगळे ,मध्यम उंचीच्या झाडांमध्ये राहणारे वेगळे, तर दाट जंगलात राहणारे वेगळे. ब्रिटिशांनी पहिल्यांदाच या सर्वांना एकत्र करून वन या व्याख्येत बसवले.
मात्र ब्रिटिश हे पक्के व्यापारी असल्याने त्यांनी भारतीय वनांचा उपयोग स्वतःची तिजोरी भरण्यासाठी हुशारीने करून घेतला. अगदी १८३४ च्या गॅझेटिअरमध्येही जंगलांचे व लाकडांचे लिलाव वनखात्याच्या अंतर्गत दिसून येतात व डेपोच्या बाजूला जंगल किती छान आहे याचाही उल्लेख यामध्ये आढळतो. त्यामुळे ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केल्यावरच वनविभाग हा महत्त्वाचा विभाग म्हणून जाहीर केला होता व वने या संज्ञेतील जमिनी तेव्हापासूनच होत्या असे ठामपणे व नक्कीच म्हणता येईल._
तर ही सर्व कागदपत्रे ,ब्रिटिशांनी केलेले सर्वे, जंगलांचे नकाशे, जंगलांची / ,वनांचे अस्तित्व दाखवणारे दाखवणारे कायदे, हे यामध्ये का उल्लेख केलेले आहेत
FAQ – वननकाशे आणि वनविभागाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र.१: वननकाशा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे?
उ: वननकाशा म्हणजे जंगलाचे अचूक भूगोल, सीमा, विभागणी, कंपार्टमेंट्स आणि हद्द दर्शवणारा अधिकृत तांत्रिक दस्तऐवज. तो वनजमिनीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, अतिक्रमण ओळखण्यासाठी, हद्द तपासणीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुरावा म्हणून अत्यंत महत्त्वाचा असतो.
प्र.२: भारतात वन विभागाची स्थापना कधी आणि का झाली?
उ: भारतात वन विभागाची स्थापना ब्रिटिश सरकारने अंदाजे १८३४ साली केली. उद्दिष्ट होते — जंगलांचे व्यापारीकरण करणे, लाकडाची मागणी पूर्ण करणे आणि वनसंपत्तीवर शासनाचे नियंत्रण ठेवणे. यानंतर जंगलांचे वैज्ञानिक व्यवस्थापन सुरू झाले.
प्र.३: भारतातील पहिला वन कायदा कोणता आणि कधी लागू झाला?
उ: भारतातील पहिला वन कायदा Indian Forest Act, 1865 हा होता. नंतर त्यात 1878 आणि 1927 मध्ये सुधारणा करण्यात आली. आजही वापरात असलेला "Indian Forest Act, 1927" हा वनजमिनीच्या संरक्षणासाठी मुख्य कायदा आहे.
प्र.४: "Father of Indian Forestry" म्हणून कोण ओळखले जातात?
उ: भारतीय जंगलांचे संवर्धन आणि वृक्षलागवड यासाठी कार्य करणारे Dr. Alexander Gibson यांना "Father of Indian Forestry" म्हटले जाते. त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातील जंगल वाचवण्यासाठी मोठे योगदान दिले.
प्र.५: वन विभाग कोणत्या प्रकारचे नकाशे आणि दस्तऐवज वापरतो?
उ: वन विभाग "Survey of India" ने तयार केलेले टोपोशीट्स, कंपार्टमेंट नकाशे, बॉड्री डीमार्केशन रजिस्टर, फॉर्म नंबर 1, गाव नकाशे, जुने सर्वे नंबर इत्यादी जवळपास ५४ प्रकारचे दस्तऐवज वापरतो. हे सर्व जंगलांच्या हद्दी आणि अस्तित्वाचे पुरावे असतात.
प्र.६: अतिक्रमण ओळखण्यासाठी वननकाशे कसे मदत करतात?
उ: वननकाशांच्या मदतीने वन विभागाला कोणती जमीन वनक्षेत्रात येते, हद्दीचे बुरुज हलवले आहेत का, अतिक्रमण झाले आहे का हे अचूक तपासता येते. नकाशांशिवाय अशी पडताळणी करणे जवळजवळ अशक्य असते.
प्र.७: लॉर्ड डलहौसीचे वन व्यवस्थापनात योगदान काय होते?
उ: लॉर्ड डलहौसी यांनी १८५५ मध्ये जंगलांचे संवर्धन आणि व्यापारीकरण यासाठी मोहीम सुरू केली. त्यांनी सागवान लागवडीचा पाया घातला आणि पुढे १८६५ च्या वन कायद्याच्या निर्मितीला गती दिली.
प्र.८: वन विभागात 'ब्लॉक रिझर्व फॉरेस्ट' म्हणजे काय?
उ: ब्रिटिश काळात जंगलाचे मोठे भाग ठेकेदारांना लाकूडतोडीसाठी देण्यात येत असत. यांना "Block Reserve Forest" म्हटले जाई. हे ब्लॉक्स कधी कधी २०,००० ते ३०,००० एकर पर्यंतही असत.
प्र.९: वननकाशांचा उपयोग आजच्या काळात कसा होतो?
उ: आजही वननकाशांचा उपयोग जमीन वाद सोडवणे, वन हद्द निश्चित करणे, विकास प्रकल्पांसाठी जमीन तपासणी, न्यायालयीन प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून आणि वन संवर्धनाच्या नियोजनासाठी केला जातो.
प्र.१०: भारतातील आधुनिक वन व्यवस्थापनाची सुरुवात कधी झाली?
उ: आधुनिक वन व्यवस्थापनाची सुरुवात ब्रिटिशांनी १८०० च्या दशकात केली. वैज्ञानिक सर्वेक्षण, टोपोशीट्स, कायदे आणि जंगलांचे वर्गीकरण यामुळे वन विभागाचे स्वरूप आधुनिक बनले.
0 Comments